आज पासून मनपा क्षेत्रातील मोकाट श्वापनांचे निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबीज लसीकरणास प्रारंभ.

अकोला दि. 8 जून 2021 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये वाढत्या मोकाट श्वानांची संख्या तसेच यामुळे शहरातील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी अकोला महानगरपालिका व्दारा सोसायटी फॉर अॅनीमल प्रोटेक्शन (सॅप) कोल्हापुर यांच्या मार्फत आणि कम्पेशन फॉर अॅनीमल्स अॅण्ड प्रोटेक्शन सोसायटी (कॅप्स) अकोला यांच्या सहकार्याने तसेच अकोला महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा क्षेत्रातील सर्व मोकाट श्वानांचा केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार निर्बिजीकरण व अॅन्टी रॅबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये दररोज शहरातील 30 ते 40 श्वानांना पकडून त्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी होम गार्ड ऑफीस जवळील मनपा शाळा क्रं.2 येथे तज्ञ डॉक्टरांकडून शस्त्रक्रिया करून अॅन्टी रॅबीज लस सुध्दा देण्यात येणार आहे व दोन दिवस त्यांना तज्ञ चमुच्या देखरेखीखाली ठेवून त्यांना ज्या ठिकाणाहून आणण्यात आले आहे त्या ठिकाणी परत सोडण्यात येणार आहे. तसेच त्यांना या दोन दिवसामध्ये खाण्यासाठी वेस्ट चिकन आणि भात...