मालमत्ता कर शास्ती अभय योजना आणि नवीन नळ जोडणी योजनेचे शेवटचे 2 दिवस, नागरिकांनी या शेवटच्या संधीचा लाभ घेउन थकित कराचा भरणा करून सहकार्य करावे - सौ.अर्चना जयंत मसने, महापौर.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना थकित मालमत्ता कर भरणे सोईचे व्हावे याकरीता मनपा प्रशासनाव्दारा शेवटची संधी म्हणून 31 डिसेंबर 2021 पर्यंत शास्ती अभय योजना म्हणजे थकित मालमत्ता करावर लागलेला संपुर्ण ब्याज माफी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच 31 डिसेंबर 2021 पुर्वी थकित मालमत्ता कराचा भरणा न केल्यास 1 जानेवारी 2022 पासून थकित मालमत्ता कराचा भरणा शास्तीसह करावा लागेल, याचसोबत शेवटची संधी म्हणून 31 डिसेंबर 2021 पर्यंत अवैध नळ जोडणी वैध करणे आणि नवीन नळ जोडणी घेण्यासाठी 400 रूपयात अभय योजना सुरू करण्यात आली आहे. याव्दारे नागरिकांना नवीन नळ जोडणी आणि अवैध नळ जोडणी वैध करण्यासाठी मनपाची फी म्हणून 3250/- रूपये ऐवजी फक्त 400/- रूपये लागतील. तसेच 1 जानेवारी 2022 नंतर तपासणी दरम्यान अवैध नळ जोडणी आढळल्यास संबंधीतांवर नियमानुसार दंडात्मक कार्यवाही करून त्यांची नळ जोडणी खंडीत करण्यात येणार आहे, कृपया संबंधीतांनी याची नोंद घ्यावी. तसेच यापुढे भविष्य काळात मालमत्ता कर आणि नवीन नळ जोडणी/अवैध नळ जोडणी साठी अभय योजना महानगरपाल...