मनपाचा थकीत मालमत्ता कर वसुलीस चालणा देण्याकरिता शास्ती अभय योजना कार्यान्वीतत
अकोला महानगरपालिका हद्दीत सन 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात (कोव्हीड-19) कोरोना या विषाणूचा प्रादुर्भावामुळे सर्वसामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ब-याच मालमत्ता धारकांना मालमत्ता कराचा वेळेवर भरणा करता आला नाही. महाराष्ट्र महानगरपलिका अधिनियम 1949 चे प्रकरण 8 कराधान नियम 41 (1) अन्वये थकीत कराच्या रक्कमेवर शास्ती आकारण्याची तरतुद आहे. त्या अनुषंगाने थकीत रक्कमेवर शास्ती (व्याज) लागले आहे. तसेच शास्तीसह संपुर्ण कराची वसुली करणे आवश्यक आहे. तथापी थकीत मालमत्ता कर वसुलीस चालना देण्याकरिता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 चे प्रकरण 8 कराधन नियम 51 अन्वये मनपा आयुक्त यांना प्राप्त अधिकारान्वये शास्ती अभय योजना सुरू करण्यात आली आहे. 0 दि. 01/03/2022 ते दि. 31/03/22 या कालावधीत जे मालमत्ता धारक थकित व चालू संपुर्ण मालमत्ता कराचा भरणा एकरक्कमी करतील त्यांना शास्ती कराच्या रकमेत 50 टक्के सुट देण्यात येईत. 0 दि. 01/04/2022 ते दि. 30/04/2022 या कालावधीत जे ...