मनपा म्युयनिसिपल मजदुर युनियन व्दारे मा.मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मनपा अधिकारी/कर्मचा-यांचे एक दिवासाचे वेतन देण्यात आले.


संपुर्ण देशात कोरोना साथ पसरत असून प्रशासनाव्‍दारे संपुर्ण देशामध्‍ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठीचे प्रयत्‍न युध्‍द पातळीवर सुरू असून कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्‍यासाठी मा.मुख्‍यमंत्री महाराष्‍ट्र राज्‍य यांनी केलेल्‍या आवाहनानुसार अकोला महानगरपालिका म्‍युनिसिपल युनियन तर्फे मनपा अधिकारी/कर्मचा-यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून मुख्‍यमंत्री सहायता निधीमध्‍ये देण्‍याचे ठरविले असून अकोला महानगरपालिका म्युनिसिपल मजदूर युनीयन तर्फे आज मनपा उपायुक्‍त श्री वैभवजी आवारे मनपा अधिकारी/कर्मचारी यांचे एक दिवसाचे वेतन कपात करून मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  यांच्या सहायता निधी खात्यामध्ये सदर रक्‍कम वळती करण्‍यासाठी पत्र देण्‍यात आले आहे.
यावेळी युनीयन चे अध्यक्ष - विठ्ठलराव देवकते ,खजीनदार-संजय खोसे ,सहखजीनदार-राजेश शिरसाट जेष्ठ मार्गदर्शक -अनिल बिडवे ,विजय पारतवार , दिलीप जाधव व उमेश सटवाले ,योगेश मारवाडी,संजय खराटे,सिद्धार्थ बागडे ,मुकुंद घाटगे,महेश राऊत ईत्यादी सह ईतर कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Comments