शहरातील गरजू नागरिकांना नाश्ता, चहा व भोजन पुरविणा-या सर्व समाजसेवी संघटना, स्वयंसेवी संघटना व दानशूर व्यक्तींचे मनापासून आभार – सौ.अर्चना जयंत मसने, महापौर अकोला.
अकोला दि. 5 एप्रील 20 - संपुर्ण शहरामध्ये लाकडउन करण्यात आले असून
हातमजुरी करणारे तसेच ईतर जिल्ह्यातील/गावांतील मजदुरी करणारे नागरिक हे अकोला
शहरामध्ये अडकले असून त्यांना भोजन, चहा, नाश्ता ईत्यादी पुरविण्यासाठी आपल्या
शहरातील विविध संघटना व दानशूर व्यक्ती मदतीसाठी उतरलेले आहे व ते दररोज ही सेवा
शहरातील गरजू नागरिकांना पुरवित आहे. यासाठी महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले आहे. याचसोबत
शहरातील सर्व गरजू नागरिकांना दररोज भोजन मिळावे यासाठी समोजसेवी संघटना, स्वयंसेवी
संघटना तसेच दानशूर व्यक्तींमध्ये दान स्विकारणा-या गरजू नागरिकांमध्ये समन्वय
साधण्यासाठी महागरपालिका येथे सोशल सेलची सेवा सुध्दा कार्यान्वीत करण्यात आली
आहे व यासोशलच्या समन्वयाने शहरातील विविध समाजसेवी संघटना, स्वयंसेवी संघटना व
दानशूर व्यक्ती आदि भोजन पुरवित आहे. तरी याकामामध्ये तुटवडा होउ नये यासाठी शहरातील
दानशूर व्यक्तींनी अकोला महानगरपालिका
सोशल सेल येथे गेहूँ किंवा आटा व तांदुळाचे दान करून आपल्या गरजू बांधवांना मदत
करावी, मदत करण्यासाठी सोशल सेलचे 1) योगेश मारवाडी – 7709588222, 2) महेश राऊत – 7709043388 यांना संपर्क करण्यासाठी महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी विनंती
केली आहे.

Comments
Post a Comment