मनपा सोशल सेलच्या समन्वयाने समाजसेवी संघटनांनी गरजूंना पुरविले भोजन.


शहरातील गरजू नागरिकांना विविध संघटनांनी नाश्‍ता, चहा व भेजन पुरविले आहे, ज्‍यामध्‍ये जिव्‍हाळा बहुउद्देशीय संस्‍था, जोगळेकर प्‍लॉट, डाबकी रोड यांनी शिवणी, नागसेन नगर येथील तसेच जिल्‍हा स्‍त्री रूग्‍णालय येथे 200 नागरिकांना पोळी व भाजीचे वितरण करण्‍यात आले तसेच जुने शहर येथील शिवमुद्रा प्रतिष्‍ठान संस्‍थाव्‍दारा लक्‍कड गंज येथील 40 घरांना तांदुळाचे वितरण केले तसेच श्री संजय अग्रवाल यांच्‍या तर्फे मलकापुर येथील लोभाजी कार्यालय जवळील 15 नागरिकांना भोजन अन्‍नधान्‍य व भाजीपालाचे वितरण रात्री 9 वाजता मलकापुर येथे मध्‍यप्रदेशहून आलेल्‍या 12 मजुरांना रामउत्‍सव समिती व्‍दारे खिचडीचे वितरण करण्‍यात आले.

अकोला शहरामध्‍ये संचार बंदीच्‍या काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्‍यक वस्‍तू पुरविणारी  सर्व सेवाभावी संघटांनांच्‍या पदाधिकारी व कार्यकर्तांचे मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी मनापासून आभार व्‍यक्‍त केले आहे व ही सेवा संचारबंदी संपेपर्यंत अशीच अविरत चालू ठेवण्‍यासाठी विनंती केली आहे. तसेच शहरातील जेही सेवाभावी संस्‍था अशा प्रकारच्‍या सेवादेत आहेत किंवा देण्‍यास ईच्‍छुक असतील त्‍यांनी अकोला महानगरपालिका सोशल सेल येथे संपर्क साधावे जेणे शहरातील सर्व गरजू नागरिकांना ही सेवा चांगल्‍या प्रकारे देता येईल असे आवाहन मनपा आयुक्‍त श्री कापडणीस यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.