कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

अकोला दि. 7 एप्रील 2021 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला शहरामध्‍ये कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या  लक्षात घेता त्‍यांना उपचारासाठी कोव्‍हीड केअर सेंटर येथे बेडची उपलब्‍धतेबाबत माहिती देण्‍यासाठी अकोला महानगरपालिका कार्यालय येथे 24 तास माहिती कक्ष (कोव्‍हीड-19 हेल्‍पलाईन कक्ष)आणि टोल फ्री क्रमांक कार्यान्‍वीत करण्‍यात आले आहे.

अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना पॉझेटीव्‍ह रूग्‍णांना शहरामधील कोरोना केअर सेंटर येथील बेड उपलब्‍धतेबाबतची माहिती घेणे सोईचे व्‍हावे याकरिता मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये टोल फ्री क्रमांक 18002335733 आणि टेलीफोन क्रं. 0724-2434412 कार्यान्‍वीत करण्‍यात आला असून अकोला शहरातील नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे कि, पॉझेटीव्‍ह आलेल्‍या रुग्‍णांना कोव्‍हीड केअर सेंटरमधील बेड उपलब्‍धतेबाबतची माहिती घ्‍यावयाची असल्‍यास त्‍यांनी 24 तास सुरू असलेल्‍या  कोव्‍हीड माहिती कक्षातील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. याचसोबत अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी, मनपा क्षेत्रामध्‍ये कोरोना पॉझेटीव्‍ह रूग्‍ण कुठेही मुक्‍त संचार करतांना आढळल्‍यास मनपाच्‍या  संबंधीत झोनमध्‍ये  किंवा क्षेत्रीय अधिकारी यांच्‍याशी संपर्क साधावा किंवा मनपातील टोल फ्री क्रमांक 18002335733 आणि टेलीफोन क्रं. 0724-2434412 यानंबरांवर माहिती देउन शहरात होत असलेल्‍या  कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्‍यासाठी सहकार्य करण्‍याचे मनपा आयुक्‍त यांच्‍या व्‍दारे आवाहन करण्‍यात आले आहे. माहिती देणा-याचे नांव गुपीत ठेवण्‍यात येणार आहे.

(टिप – सद्या स्थितीत नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्‍याने आज दि. 19/04/2021 पासून पुढील आदेशापर्यंत सदर सुविधा बंद करण्‍यात येत आहे.) 

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.