मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.
अकोला महानगरपालिका प्रशासना व्दारा ‘’आजादी का अमृत
महोत्सव’’ - ‘’मेरी माटी मेरा देश’’ अर्थात ‘’माझी माती माझा देश’’
उपक्रमांत शासनाच्या मार्गदशक सुचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले
असून ज्यामध्ये अभियानात शहरामध्ये वसुधा वंदन, शीला फलकम (स्मारक),
पंचप्रण शपथ, अमृत वाटीका ‘’हर घर तिरंगा’’ या कार्यक्रमांचा समावेश आहे.
या अनुषंगाने
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी आपल्या घरावर आणि प्रतिष्ठानावर राष्ट्रीय
ध्वज फडकावून या राष्ट्रीय कामामध्ये सहभागी होण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा
प्रशासक कविता व्दिवेदी यांनी केले आहे.
अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारो ध्वज विक्री साठी खालील प्रमाणे व्यवस्था केली असून प्रतिध्वज मात्र 30/- रूपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
अकोला महानगरपालिका मुख्य कार्यालयाच्या प्रवेश व्दारावर पूर्व झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 15, अजमेरा हॉस्पीटल समोर, रतनलाल प्लॉट, अकोला. पश्चिम झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 1, डाबकी रोड पोलीस स्टेशनच्या बाजुला,
डाबकी रोड, जुने
शहर, अकोला. उत्तर झोन कार्यालय – जुनी
मनपा शाळा क्रं. 2, पाण्याच्या टाकीजवळ, रेल्वे स्टेशन रोड, अकोला. दक्षिण झोन कार्यालय – मौलाना
अब्दुल कलाम आझाद कॉम्प्लॅक्स, सिंधी कॅम्प, अकोला. |
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
Comments
Post a Comment