मनपा कोंडवाडा विभागामर्फत परिसरात अस्वच्छता पसरविणा-या व्यावसायिकाचे 4 म्हशी जप्त करण्यात आल्या.


अकोला दि. 6 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुविर अकोला महानगरपालिका कोंडवाडा विभाग व आरोग्‍य विभागामार्फत रामदास पेठ पोलीस स्‍टेशनच्‍या सहाय्याने कामा प्‍लॉट येथील लालताप्रसाद शुक्‍ला व मोहीत शुक्‍ला यांच्‍याव्‍दारे परिसरात म्‍हशी बांधुन अस्‍वच्‍छता पसरविणा-या दुग्‍ध व्‍यवसायिकांच्‍या 4 म्‍हशी ताब्‍यात घेउन कोंडवाड्यात टाकण्‍यात आल्‍या आहेत. कारवाई दरम्‍यान व्‍यावसायिकांव्‍दारे वाद घालण्‍यात आला होता. त्‍यासाठी रामदास पेठ पोलीसांना बो‍लविण्‍यात आले होते.
          सदर कारवाई मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये व मनपा उपायुक्‍त श्री वैभव आवारे यांच्‍या मार्गदर्शनात झाली असून कारवाईत आरोग्‍य विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, कोंडवाडा विभाग प्रमुख श्री हेमंत शेळवणे, रामदास पेठ पोलीस स्‍टेशनचे थानेदार श्री एम.एस.ठाकरे व पोलीस कर्मचारी यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आली असून कारवाईत  रणजीत संगेळे, राजेश्‍वर गोडाले, राजेश गोडाले, आशु बमन, दिपक टोबरे, विलास इंगळे आदिंचा समावेष होता.  

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.