मनपा आयुक्त यांनी केली सकाळी प्रभागातील स्वच्छतेची पाहणी, 9 आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस.
अकोला दि. 6 एप्रील 20 – कोरोना विषणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा
प्रशासना कडून आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून
आरोग्य विभाग (स्वच्छता) हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असून अशा परिस्थितीत
सर्व आरोग्य विभागाशी संबंधीत अधिकारी कर्मचारी हे आपल्या कर्तव्यावर हजर राहणे
हे क्रमप्राप्त असून आज सकाळी 6 वाजता पासून मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस
यांनी अकोला मनपा प्रभाग क्रं. 8, 10, 11, 12, 13 व 18 यांची पाहणी केली असता
प्रभागांमध्ये ब-यास ठिकाणी अस्वच्छता आढळून आली व संबंधीत प्रभागांचे आरोग्य
निरीक्षक हे आपल्या कर्तव्यावर हजर नसल्याचे आढळून आले असता त्यांना 24 तासाच्या
आत स्पष्टीकरण देण्यासाठी एकुण 9 आरोग्य निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात
आल्या आहेत. याचसेबत काही सफाई कर्मचा-यांना त्यांच्या हजेरीचे ठिकाणाबाबत
विचारणा केली असता त्यांना ते माहीत नसल्याचे आढळून आले तसेच आरोग्य विभाग
प्रमुख यांचा स्वच्छतेच्या कामकाजावर
संपुर्णपणे लक्ष असणे हे क्रमप्राप्त असून परंतू असे होत नसल्याचे दिसून आले
असल्याने त्यांना सुध्दा कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे.
याचसोबत मनपा आयुक्त यांनी झोन निहाय असलेल्या भाजी
बाजारांची पाहणी केली असता भाजी विक्रेते व नागरिक हे सोशल डिस्टसींगचे नियम पाळत
नसल्याचे आढळून आले ही बाब अत्यंत गंभीर असून तसेच प्रभागांमध्ये विविध ठिकाणी,
मुख्य रस्त्यावर, सर्व्हिस लाईनमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा आढळून व नाल्यासुध्दा
अस्वच्छ असल्याचे आढळून आल्याने मनपा आयुक्त यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी
यांनी आपल्या स्टाफसह आप-आपल्या
कार्यक्षेत्रात असलेल्या भाजी बाजार येथे जाउन भाजी विक्रेते व नागरिक यांना सोशल
डिस्टसींग कायद्याचे काटेकोरपणे पालन करण्याकरिता नियोजन करावे व प्रभागातील संपुर्ण
स्वच्छतेबाबत आरोग्य निरीक्षकांची बैठक घेउन प्रभागातील कचरा उचलण्याकरिता व
नाल्या स्वच्छ करण्याकरिताची कार्यवाही तात्काळ करावी, तसेच प्रभाग निहाय सफाई कर्मचारी किवा पडीत
प्रभागातील सफाई मजूर कमी आढळल्यास संबंधीत आरोग्य निरीक्षकांवर दंडात्मक
कारवाई करण्यात येणार असल्याबाबतची सुचना दिली आहे. तसेच यापुढे ज्या प्रभागात
कचरा व अस्वच्छता आढळून आल्यावर संबंधीत क्षेत्रीय अधिकारी यांचे विरूध्दसुध्दा
नियमानुसार कारवाई करण्याचा ईशारा मनपा आयुक्त यांनी दिला आहे.

Comments
Post a Comment