मनपा शालेय विद्यार्थ्यांना तिन किलो प्रति प्रमाणे तांदुळाचे वितरण करावे – मनपा उपायुक्त श्री वैभव आवारे.


आज महानगरपालिकेच्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुख्‍य सभागृह येथे सोशल डिस्‍टसींग नियामाचे पालन करून मनपा उपायुक्‍त श्री वैभव आवारे यांनी शालेय पोषण आहार अंतर्गत मनपा शाळा स्‍तरावर उपलब्‍ध असलेल्‍या तांदुळ साठ्याचा विद्यार्थ्‍यांना वितरण करण्‍यासाठी नियोजन बैठक घेतली आहे.
          या बैठकीत महानगरपालिकेती सर्व शाळामध्‍ये उपलब्‍ध असलेला तांदुळा मधून प्रति विद्यार्थी तीन किलो या प्रमाणे तांदुळ वितरीत करण्‍यासाठी शाळा स्‍तरावर नियोजन करून मुख्‍याद्यापक व शिक्षक यांनी वर्गनिहाय वाटप करण्‍याचे सुचना मनपा उपायुक्‍त यांनी दिल्‍या. तसेच  शाळेत गर्दी होणार नाही तसेच सोशल डिस्‍टसींगचे पुर्ण नियम पाळून मैदानामध्‍ये किमान 1 मिटर अंतरावर आखणी करून वितरण करावे व शिक्षकांनी सुध्‍दा या नियमाचे पालन करावे,  विद्यार्थ्‍यांपैकी कोणतेही पालक होम क्‍वारंटाईन असल्‍यास त्‍यांनी घरीच राहावे व त्‍यांना तादुळ घरपोच देण्‍यासाठी नियोजन करावे तसेच ज्‍या शाळेमध्‍ये तांदुळ साठा उपलब्‍ध नसेल किंवा कमी प्रमाणात असेल त्‍यांनी नजीकच्‍या शाळेमधून समायोजन याप्रमाणे कार्यवाही करावी आदिंबाबत सुचना दिल्‍या.
          यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.शाहीन सुल्‍ताना, सर्व मनपा शाळांचे मुख्‍याद्यापकांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.