मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध समाजसेवी संघटनांनी शहरातील गरजूंना पुरविले भोजन.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संचार बंदीच्या काळामध्ये अकोला महानगरपालिकेच्या सोशल सेलच्या समन्वयाने शहरातील एकुण 1130 गरजू नागरिकांना नाश्ता, चहा व भोजन पुरविण्यात आले आहे. ज्यामध्ये जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था, जोगळेकर प्लॉट, डाबकी रोड, संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान, ओ.एन.जी.ग्रुप, श्रीराम उत्सव समिती, यांचेसह कृष्णा सोमानी, शिवनगर गोडबोले प्लॉट येथील मनोज चोपडे आदिंच्या व्दारे आज जवळपास 1130 गरजूंना अन्नदान करण्यात आले.
अकोला शहरामध्ये संचार बंदीच्या काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरविणारी सर्व सेवाभावी संघटांनांच्या पदाधिकारी व कार्यकर्तांचे तसेच दानशूर नागरिकांचे मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे व ही सेवा संचारबंदी संपेपर्यंत अशीच अविरत चालू ठेवण्यासाठी विनंती केली आहे. तसेच शहरातील जेही सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या सेवादेत आहेत किंवा देण्यास ईच्छुक असतील त्यांनी परस्पर भोजन न देता अकोला महानगरपालिका सोशल सेलशी संपर्क साधावे जेणे शहरातील सर्व गरजू नागरिकांना ही सेवा चांगल्या प्रकारे देता येईल असे आवाहन मनपा आयुक्त श्री कापडणीस यांनी केले आहे.
अकोला महानगरपालिका सोशल सेल येथील कर्मचा-यांचे नांव व मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहे.
1) योगेश मारवाडी – 7709588222,
2) महेश राऊत – 7709043388, 3) राजेंद्र देशमुख- 7709043155, 4) पंकज देवळे - 9850162539 कृपया दानशूर नागरिकांनी व समाजसेवी संघटानांनी या क्रमांकांवर संपर्क साधून शहरातील प्रत्येक गरजू नागरिक पर्यंत भोजनाची सेवा उपलब्ध होईल यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
|
Comments
Post a Comment