मनपा शालेय विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी तिन किलो तांदुळाचे वितरण



अकोला दि. 3.04.2020 –  कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर शहरात असलेल्‍या लॉकडाउन पाहता अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे शाळांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या साठ्यातून प्रति विद्यार्थ्‍यांना तिन किलो तांदुळाचे वितरण करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता त्‍या अनुषंगाने आज अकोला महानगरपालिका अधिनस्‍त असलेल्‍या हिंदी, मराठी, उर्दु व गुजराथी माध्‍यमांच्‍या जवळपास सर्व शाळांमध्‍ये सोशल डिस्‍टसींग नियामाचे पालन करून पालकांना बोलावून प्रति विद्यार्थी प्रमाणे तीन किलो तांदुळाचे वितरण करण्‍यात आले आहे. त्‍याचप्रमाणे ज्‍या पालकांना शाळेमध्‍ये येणे शक्‍य झाले नाही अशा पालकांना घरपोच शिक्षकांव्‍दारे तांदुळ पोहचविण्‍यात आले.
          यावेळी सोशल डिस्‍टसींग पाळण्‍यासाठी सर्व शाळांमध्‍ये शिक्षकांव्‍दारे पालकांना उभे राहण्‍यासाठी 1 मिटर अंतरावर चुन्‍याने आखणी करून पालकांना रांगेत उभे करून तांदुळाचे वितरण करण्‍यात आले आहे. तसेच यावेळी आलेल्‍या पालकांना मनपा शाळेतील मुख्‍याद्यापक/शिक्षकांनी कोरोनाच्‍या रोकथामासाठी शासनाने दिलेल्‍या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्‍यासाठीच्‍या सुचना दिली, ज्‍यामध्‍ये नियमीत वारंवार साबणाने किंवा हॅण्‍ड वॉश व्‍दारे हात धुणे, घराबाहेर न निघणे, घरामध्‍ये सुध्‍दा सोशल डिस्‍टगींग नियमाचे पालन करणे, अतिआवश्‍यक असेल तरच घराबाहेर पडणे व बाहेर जातांना तोंडावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रूमाल बांधुन व आपसातील अंतर ठेउन जाणे व खरेदी करतांना सुध्‍दा आपसातील अंतर ठेउनच समान खरेदी करणे आदिंबाबत मार्गदर्शक सुचना देण्‍यात आल्या.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.