मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा, खिचडी व भोजन.


अकोला दि. 3 एप्रील 20 - कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संचार बंदीच्‍या काळामध्‍ये अकोला महानगरपालिकेच्‍या सोशल सेलच्‍या समन्‍वयाने विविध समाजसेवी संघटना, स्‍वयंसेवी संघटना व दानशूर व्‍यक्तिंव्‍दारे शहरातील एकुण 1625 गरजू नागरिकांना नाश्‍ता, चहा व भोजन पुरविण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये जिव्‍हाळा बहुउद्देशीय संस्‍था, संत ज्ञानेश्‍वर बहुउद्देशीय संस्‍था, शिवमुद्रा प्रतिष्‍ठान, .एन.जी.ग्रुप, श्रीराम उत्‍सव समिती, डॉ. रूहाटिया ट्रस्‍ट, रॉबीनहूड आर्मी, शिवर मित्र मंडळ, श्री फिश वर्ल्‍ड एक्‍वेरियम संस्‍था, अमृत भोज रोटरी क्‍लब, विहान इंटरप्राईजेस, श्रीनिवास केटरींग यांचेसह  सागर जाधव, वैभव देशमुख,  आदिंच्‍या व्‍दारे आज  जवळपास 1625 गरजूंना अन्‍नदान करण्‍यात आले. तसेच मनपाच्‍या सोशल सेलच्‍या सहाय्याने स्थानिक ख्रिस्ती समाजच्‍या वतीने एबन-एजर ग्रुपव्‍दारे शहरामध्‍ये गोर गरीब निराधार गरजूंना अन्न वाटप करण्यात आले आहे. एबन-एजर ग्रुपचे शरमून कदम यांनी समाजबांधवांशी विनंती केली आहे कि, ज्‍या ख्रिस्ती समाजच्‍या बांधवांना यामध्‍ये काही मदत करावयाची असेल त्‍यांनी  ग्रुपशी किंवा मनपा सोशल सेलशी संपर्क साधावे. यावेळी एबन-एजर ग्रुपचे रेव. मोजस वानखडे, शलमोन कदम, संदीप करमकर, निलेश प्रधान, आशुतोष दामले, शमोल चक्रनारायण, अनुल मनवर, शैलेश कदम, सुनिल मकासरे, सरूप घाटगे, राहूल साठे, संचीन जॉन, जस्‍टीन भिसे यांचा समावेश होता 

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.