मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा, खिचडी व भोजन तसेच विविध भागातील दिव्यांगांना अन्न/धान्य व किराणाचे वितरण.


अकोला दि. 4 एप्रील 20 - कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संचार बंदीच्‍या काळामध्‍ये अकोला महानगरपालिकेच्‍यासोशल सेलच्‍या समन्‍वयाने विविध समाजसेवी संघटना, स्‍वयंसेवी संघटना व दानशूर व्‍यक्तिंव्‍दारे शहरातील एकुण 1590 गरजू नागरिकांना नाश्‍ता, चहा व भोजन पुरविण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये जिव्‍हाळा बहुउद्देशीय संस्‍था, संत ज्ञानेश्‍वर बहुउद्देशीय संस्‍था, शिवमुद्रा प्रतिष्‍ठान, .एन.जी.ग्रुप, श्रीराम उत्‍सव समिती, डॉ. रूहाटिया ट्रस्‍ट, शिवर मित्र मंडळ, श्रीनिवास कॅटरींग, आशीष सारडा समर्थ सेवा मंडळ यांचेसह  वैभव देशमुख, आर्शिया खान आदिंच्‍या व्‍दारे आज  जवळपास 1590 गरजूंना अन्‍नदान करण्‍यात आले.
एकुण 5 दिव्‍यांग गरजुंना अन्‍न/धान्‍य व किराणाचे वितरण.
        कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संपुर्ण शहर लॉकडाउन असून आज दि. 4 एप्रील रोजी अकोला महानगरपालिकेतील सोशल सेलच्‍या समन्‍वयाने शिवाजी चौक, शिवसेना वसाहत 1, धनलक्ष्‍मी गॅस गोडाउन भरतीया धर्मखाळा जवळ 1, डागकी रोड रेलवे गेट जवह 1, आकोट फैल, परदेसीपुरा येथील 2  गरजू दिव्‍यांग व्‍यक्तिच्‍या परिवाराला दानशूर व्‍यक्तिकडून भेटलेले अन्‍न/धान्‍य व किराणा साहित्‍य देण्‍यात आले.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  संपूर्ण शहरांमध्ये  लॉक डाऊन करण्यात आलेला आहे व  दिव्यांग लाभार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेता मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये आज दि. 4 एप्रिल रोजी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील पात्र असलेले लाभार्थ्‍यांना माहे मार्च महिन्‍याचा एकुण 904 लाभार्थ्‍यांच्‍या खात्यामध्ये उदरनिर्वाह भत्‍ता टाकण्‍यात आले आहे. अशी माहिती मनपा उपायुक्त श्री वैभव आवारे व दिव्यांग कक्ष प्रमुख नंदिनी दामोदर यांनी दिली आहे.  

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.