श्री मार्कंडेय पद्मशाली समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष विजय पारतवार यांच्या तर्फे समाज बांधवांना अन्न/धान्याचे वितरण.


कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संपुर्ण राज्‍यात लॉकडाउन करण्‍यात आले आहे त्‍या अनुषंगाने श्री मार्कंडेय पद्मशाली समाज युवा फाऊंडेशनचे अध्‍यक्ष तथा मनपाचे कर अधिक्षक विजय पारतवार  अकोला येथील  रहिवासी पद्मशाली समाज बांधवांना जाहीर आव्हान केले आहे कि,  जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भाव पसरला असल्यामुळे रोगाचा प्रसार टाळण्यासाठी समाज बांधवांनी घरा बाहेर पडू नये. तसेच अकोला शहरांमधील समाज बांधवांची उपासमारी होऊ नये व मानवतेच्या दृष्टीकोनातून अकोल्‍यातील रहिवाशी असणारे गरजू समाज बांधवांना आवश्यक अन्नधान्य विनामूल्य देण्याचे ठरवले आहे. त्‍या अनुषंगाने काल दि. 2 एप्रील रोजी श्री मार्कंडेय पद्मशाली समाज युवा फाऊंडेशनचे अध्‍यक्ष विजय पारतवार व सौ.पुष्‍पाताई विजय पारतवार यांचे कडून समाजातील गरजूंना अन्‍न धान्‍याचे वितरण करण्‍यात आले. विजय पारतवार यांनी स्‍वतःच्‍या खर्चाने हा उपक्रम राबविला असून यावेळी समाजातील तेजस पारतवार, प्रकाशराव पारतवार, सुनिल बाचनवार, सुनिल बेतवार, सत्‍नारायण कोंडावार, सेतोष बेतवार, कमलेश इस्‍टमवार, अमीत चुंचुवार यांची उपस्थिती होती.
           संचारबंदीच्या काळात समाजबांधवास कोणत्याही प्रकारची मदत जसे औषध, अन्नधान्य, वैद्यकीय सेवा, अॅम्‍बुलंस सेवा इत्यादि कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास विजय पारतवार मो.नं. 7709177666/7709277666 या नंबरवर संपर्क साधून सेवा करण्‍याची संधी द्यावी अशी विनंती केली आहे. तरी शहरामध्‍ये राहणा-या सर्व समाज बांधवांना विजय पारतवार यांनी विनंती आहे कि, त्‍यांनी घराबाहेर पडू नये व कोरोनाशी लढा देण्‍याच्‍या कामामध्‍ये सहकार्य करावे.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.