मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा, खिचडी व भोजन.
अकोला 2 एप्रील 20 – कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संचार बंदीच्या काळामध्ये अकोला महानगरपालिकेच्या सोशल सेलच्या समन्वयाने सामाजिक संघटना, स्वयंसेवी
संघटना व दानशूर व्यक्तिंव्दारे शहरातील एकुण 1430 गरजू नागरिकांना नाश्ता, चहा व भोजन पुरविण्यात आले आहे. ज्यामध्ये ओ एम जी ग्रुप यांच्याव्दारे अकोली येथे 200 गरजुंना
संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्थेद्वारे शिवनी राहुल नगर येथे 200 गरजुंकरिता, शिवमुद्रा प्रतिष्ठान
द्वारे पंचशील नगर, खरब रोड येथे 60 गरजुंकरिता अकोट फाइल
येथे 50 गरजुंकरिता, वैभव देशमुख व त्यांच्या ग्रुपने मलकापूर येथे 25
मुलींकरता व कौलखेड येथे 200 गरजुंकरिता,
रुहाटिया ट्रस्ट यांच्या द्वारे शांतीनगर चहाचा
कारखाना येथे पन्नास गरजुंकरिता, कामगार कल्याण भवन मागे 250 गरजुंकरिता, अनिमेश चुंगडे यांच्याव्दारे
अनिकट येथे 100 गरजुंकरिता, आंबेडकर नगर येथे जवळाबाजार येथे
50 ते 60 गरजुंकरिता, रामदेव बाबा
मंदिरामागे 70 गरजुंकरिता, मॅन हॉस्पिटल येथे 40 गरजुंकरिता, लेडी हार्डिंग येथे 125 गरजुंकरिता,
ख्रिश्चन समाजा कडून आदर्श कॉलनी व गायत्री मंदीर अशोक वाटिका येथे विविध ठिकाणी जवळपास 200 गरजुंकरिता असे एकूण 1430 गरजुंना आज अन्नदान करण्यात आले.
अकोला शहरामध्ये संचार बंदीच्या काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पुरविणारी सर्व सेवाभावी संघटांनांच्या पदाधिकारी व कार्यकर्तांचे तसेच दानशूर नागरिकांचे मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी मनापासून आभार व्यक्त केले आहे व ही सेवा संचारबंदी संपेपर्यंत अशीच अविरत चालू ठेवण्यासाठी विनंती केली आहे. तसेच शहरातील जेही सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या सेवादेत आहेत किंवा देण्यास ईच्छुक असतील त्यांनी परस्पर भोजन न देता अकोला महानगरपालिका सोशल सेलशी संपर्क साधावे जेणे शहरातील सर्व गरजू नागरिकांना ही सेवा चांगल्या प्रकारे देता येईल असे आवाहन मनपा आयुक्त श्री कापडणीस यांनी केले आहे.
अकोला महानगरपालिका सोशल सेल येथील कर्मचा-यांचे नांव व मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहे.
1) योगेश मारवाडी – 7709588222, 2) महेश राऊत – 7709043388, 3) राजेंद्र देशमुख- 7709043155, 4) पंकज देवळे - 9850162539 कृपया दानशूर नागरिकांनी व समाजसेवी संघटानांनी या क्रमांकांवर संपर्क साधून शहरातील प्रत्येक गरजू नागरिक पर्यंत भोजनाची सेवा उपलब्ध होईल यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.
|
Comments
Post a Comment