देशाचे पंतप्रधान यांनी कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केलेल्या आवाहनाला शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे ही विनंती – सौ.अर्चना जयंत मसने, महापौर अकोला.
अकोला दि. 5 एप्रील 20 – संपुर्ण जगासोबतच आपल्या देशातही आता कोरोना विषाणू
हा आपले पाय पसारू लागला आहे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्याची साखळी
तोडणे हा एकमेव उपाय असून आपल्या देशाचे पंतप्रधान मा.श्री नरेंद्रजी मोदी यांनी
ही साखळी तोडण्यासाठी संपुर्ण देशात लॉकडाउन घोषीत केले आहे. यास साखळी तोडण्याच्या
कामामध्ये शहरातील प्रत्येक नागरिकांनी घरीच थांबून ही साखळी तोडण्याच्या
प्रयत्न करणे आता खूप गरजेचे आहे. याचसोबत बारंवार हात धुणे, तोंडावर चांगला
धुतलेला रूमाल बांधूण राहणे, बाजारपेठेत जातांना सोशल डिस्टगींग नियमाचे काटेकोर
पालन करणे, दररोज चांगला आहार घेउन आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आदिंबाबच्या
उपाययोजन करूनच आपण कोरोनाशी लढा देउ शकतो व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठीचा
उपाय हा आपल्या कडेच असून शहरातील सर्व नागरिकांनी घरातच थांबून कोरोनाची साखळी
तोडण्यामध्ये आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडून सहकार्य करण्यासाठी कडकळीची विनंती
महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी केली आहे.

Comments
Post a Comment