कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाहेरील गांवातून/जिल्ह्यातून/राज्यातून व मरकज निजामुद्दीन दिल्ली येथून आलेल्या नागरिकांची माहिती मनपा प्रशानास द्यावी – श्री संजय कापडणीस, आयुक्त मनपा अकोला.
अकोला दि. 6 एप्रील 20 – कोरोनाच्या पार्श्वभुविर अकोला महानगरपालिका व्दारे
300 पथकांच्या सहाय्याने महानगरात बाहेरील गांवातून, जिल्ह्यातून व राज्यातून
आलेल्या जवळपास सव्वा पांच हजार मालमत्तांचा
सर्व्हेक्षणाचे कार्य युध्द पातळीवर करण्यात आलेला आहे याचसोबत मरकज
निजामुद्दीन दिल्ली येथून आलेल्या
नागरिकांचा सर्व्हेक्षण सुध्दा झोननिहाय 4 वैद्यकीय पथकांव्दारे करण्यात आलेला
आहे, मात्र असे असतांना सुध्दा बाहेरील गांवातून, जिल्ह्यातून व राज्यातून व
मरकज निजामुद्दीन दिल्ली येथून नागरिक अद्यापही अकोला शहरामध्ये प्रवेश करीत
आहेत, या नागरिकांची वैद्यकीय तपासणी अत्यावश्यक असल्याने व शहरात कोरोना
विषाणूचा प्रादुर्भाव होउनयेत म्हणून अशा नागरिकांची माहिती त्यांच्या शेजारील
नागरिकांनी अकोला महानगरपालिकेस देणे आवश्यक आहे.
कोरोना विषणूचा संक्रमण अकोला शहरात
होउ नये यासाठी शहरातील नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाव्दारे विनंती करण्यात
येत आहे कि, त्यांच्या आजु-बाजुच्या नागरिकांनी किंवा स्वत:नी आपली माहिती
अकोला महानगरपालिकेच्या कंट्रोल रूमच्या टोल फ्री व हेल्पलाईन नंबर 18002335733/0724-2434412/0724
- 2423290/0724 - 2434414/0724 – 2430084 या नंबरांवर देउन या राष्ट्रीय कामामध्ये
मोलाचे सहकार्य करावे ही विनंती.
Comments
Post a Comment