शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार शहरात फव्वा्रणी व फॉगींगचे काम बंद – मनपा आयुक्त.
अकोला 2 एप्रील 20 – अकोला महानगपालिका
क्षेत्रामध्ये कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मुख्य रस्ते, शासकीय कार्यालये, मुख्य
बाजार पेठ, प्रभागातील रस्ते व सार्वजनिक ठिकाणांवर सेनीटेशन, स्वच्छता व फव्वारणी चे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलेले आहे व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार आता फव्वारणी व
फॉगींगचे काम मनपा प्रशासनाव्दारे बंद करण्यात आले आहे तरी शहरातील सर्व
नागरिकांनी यासाठीचे आग्रह करू नये. तसेच शहरामध्ये स्वयंसेवी संघटना मार्फत
होणारी फव्वारणी सुध्दा त्यांनी बंद करावी. व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जास्त वरदळीचे ठिकाणांवर
नागरिकांचा मोठ्या प्रमाणात स्पर्श होतो अशा ठिकाणी फक्त फव्वारणीचे काम मनपा प्रशासनाव्दारे
करण्यात येणार आहे ईतर ठिकाणी नाही. तसेच शासनाच्या वेळोवेळी येणा-या मार्गदर्शक सुचनेनुसारच फव्वारणी
व फाफगींगचे काम मनपा प्रशासनाव्दारे करण्यात येणार असल्याबाबत मनपा आयुक्त
यांनी सांगितले आहे.
Comments
Post a Comment