शहरातील दिव्यांग गरजुला मनपा सोशल सेलच्या समन्वयाने अन्न/धान्य वितरण.
अकोला दि. 3.04.2020 – कोरोनाच्या
पार्श्वभुमिवर संपुर्ण शहर लॉकडाउन असून वयोवृद्ध आणि
दिव्यांग, एकाकी राहणा-या ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी (सोशल सेल व कंट्रोल
रूमच्या समन्वयाने स्वयंसेवी मार्फत पुरविण्यात येणारे भोजन अन्न धान्य व ईतर
सेवा) यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार मनपा आयुक्त श्री
संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये नोडल अधिकारी म्हणून दिव्यांग कक्ष प्रमुख
यांची नियुक्ती करण्यात आली आहे व अकोला महानगरपालिकेतील सोशल सेलच्या समन्वयाने
शहरातील समाजसेवी संघटना व स्वयंसेवी संघटना यांच्या व्दारे गरजू दिव्यांग व
एकाकी राहणारे, ज्येष्ठ नागरिक यांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याच्या
सुचनेवरून आज कमला नेहरू नगर येथील दिव्यांग व्यक्तिच्या परिवाराला दानशूर व्यक्तिकडून
भेटलेले अन्न/धान्य व किरणा साहित्य देण्यात आले
Comments
Post a Comment