कोरोना विषाणूच्या संसर्गापासून संरक्षणसाठी नागरिकांनी आरोग्य सेतू अॅप डाउनलोड करणे खूप गरजेचे - संजय कापडणीस, आयुक्त मनपा अकोला.


अकोला दि. 31 मे 2020 – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोनाचा वाढत्‍या प्रादुर्भावावर नियंत्रण    आणण्‍यासाठी तसेच कोरोना पासून आपले संरक्षण करण्‍यासाठी शहरातील प्रत्‍येक नागरिकनी आपल्‍या अॅण्‍डरॉईड मोबाईल मध्‍ये केंद्र शासनाव्‍दारे सुरू करण्‍यात आलेला आरोग्‍य सेतू अॅप असणे खूप गरजेचे आहे असे प्रतिपादन मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांनी केले आहे.
          आपल्‍या अॅण्‍डरॉईड मध्‍ये प्‍ले-स्‍टोअर तसेच आय फोनच्‍या अॅप-स्‍टोअर मधून आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करावे व आपली आरोग्‍य विषयक माहिती भरावी. तसेच घराबाहेर जातांना त्‍याचे लोकेशन व ब्‍लूटूथ नेहमी सुरू ठेवावे  जेणे करून आपण कोरोना संक्रमीत व हायरीस्‍क मध्‍ये असलेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या जवळ आलो किंवा अस व्‍यक्‍ती आपल्‍या जवळ आला तर आपला मोबाईल अलर्ट करतो म्‍हणून शहरातील प्रत्‍येक नागरिकांच्‍या मोबाईल मध्‍ये हा अॅप असणे व आरोग्‍य विषयक अपडेट करणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. तरी शहरातील प्रत्‍येक नागरिकांनी आरोग्‍य सेतू अॅप डाउनलोड करून कोरोनाला लढा देण्‍याच्‍या कामामध्‍ये सहकार्य करावे असे आवाहन मनपा आयुक्‍त यांनी केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.