जनता भाजी बाजार येथील दुकानदारांना प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये भाजी व फळ विक्री करण्याास मुभा.

अकोला दि. 20 एप्रील 2021 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भावावर आळा घालण्याच्या दृष्टीने प्रशासनाने अकोला शहरातील जनता भाजीबाजार संदर्भात दि. 16/4/2021 रोजी मनपा प्रशासनाने आदेश निर्गमित केले होते. जनता भाजी बाजार सदंर्भात मा.जिल्हाधिकारी यांचे कार्यालयामध्ये दि. 20/4/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता झालेल्या आढावा बैठकीच्या अनुषंगाने या आदेशामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने मनपा आयुक्त नीमा अरोरा यांनी , खालील प्रमाणे आदेश दिले आहे. 0 सदर आदेश हा दिनांक 21 एप्रिल 2021 रोजीचे सकाळी 11 वाजता पासून पुढील आदेशापर्यंत जनता भाजी बाजार व ईतर ठिकाणी भाजी व फळ विक्री करणा-या किरकोळ व्यावसायिकांकरिता लागू होत आहे. 0 ज्यांची जनता बाजार येथे किरकोळ भाजीपाला व फळ व्यवसायाची दुकाने आहेत त्यांनाच भाजीपाला व फळ विक्री करण्यास मुभा राहील. या व्यतिरिक्त जनता भाजी बाजार येथे रस्त्यावर व दुकानाच्या समोर खाली बसून व्यावसाय करणा-या कोणत्याही किरकोळ भाजीपाला व फळ विक्री करण्या-याला या ठिकाणी व्यवसाय करता येणार न...