मनपा क्षेत्रातील जनता भाजी बाजार, रहदारीचे मार्ग तसेच जुना भाजी बाजार येथे भाजीपाला विक्री व हर्रासीवर पुर्णपणे बंदी. जनता भाजी बाजार येथे फक्त फळ हर्रासीला सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत मुभा.
अकोला दि. 17 एप्रील 2021 – देशासह अकोला महानगरपालिका क्षेत्रातसुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर जास्त प्रभावीपणे नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने मनपा आयुक्त यांच्या आदेशान्वये अकोला महानगरपालिका क्षेत्रातील जनता भाजी बाजार येथे दि. 18 एप्रील 2021, सकाळी 10 वाजेच्या नंतर पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारची भाजीपाला व फळ विक्री अथवा हर्रासीवर पुर्णपणे बंदी राहणार आहे. 0 जनता भाजी बाजार येथे सकाळी 7 ते 10 वाजेच्या दरम्यान फक्त फळांची हर्रासीला सोशल डिस्टसींग नियमाचे पालन करून व चेह-यावर मास्क आणि सेनीटायझरचे वापर करून मुभा देण्यात आली आहे. 0 भाजीपाला विक्री, हर्रासी करण्याकरिता महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी व्यवसाय करण्यास मुभा राहील. 0 महात्मा फुले भाजी बाजार - वाशिम रोड व सावित्रीबाई ज्योतीबा फुले भाजी बाजार - लोणी रोड या ठिकाणी घाऊक व्यवसाय करण्यारिता आवश्यक व्यवस्था असल्यामुळे पर्यायी जागा म्हणुन जनता भाजी बाजाराचा यापूढे हरार्सीकरीता वापर करता येणार नाही. 0 जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ भाजीपाला विक्री करणारे व्यवसायीक यांची भाटे क्लब प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 0 जनता भाजीबाजार, जुना भाजी बाजार, जैन मंदिर रोड, ओपन थियेटर ते फतेहअली चौक येथे किरकोळ फळ विक्री करणारे व्यवसायीक यांची मुंगीलाल बाजोरिया प्रांगण येथे व्यवसाय करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 0 किरकोळ भाजीपाला / फळ विक्री करीता व्यवसायीक यांना परवानगी दिलेल्या जागेत कोरोना नियमांचे पालन करुन आपला व्यवसाय करावा. दिलेल्या जागे व्यतिरिक्त इतर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये व्यवसाय करीत असल्याचे आढळुन आल्यास प्रशासनाकडुन कोराना नियमांचे उल्लंघण करीत असल्याचे गृहित धरुन कठोर कारवाई करण्यात येईल. 0 जनता भाजी बाजार येथे किराणा व जिवनावश्यक वस्तुची विक्रीचे व्यवसायास विहित कालावधी करिता व्यवसाय करण्याची मुभा राहील. 0 उपरोक्त व्यवसाय धारकांना व्यवसाय करतांना सोशल डिस्टंसिंग तसेच मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाची
अंमलबजावणी न करणा-या व्यावसायिकांविरुध्द महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व
साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 2005 अन्वये कारवाई करण्यात येणार तरी भाजी व फळ
विक्री व हर्रासी करणा-या व्यावसायिकांनी याची नोंद घेउन महानगपालिका प्रशासनास
सहकार्य करावे.
अकोला महानगरात कोरोना विषाणूचा वाढत असलेला प्रादुर्भाव लक्षात
घेता शहरातील नागरिकांनी सोशल डिस्टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करणे तसेच
चेह-यावर मास्क आणि सॅनीटायरझरचे वापर करून तसेच प्रशासनाव्दारे वेळोवेळी
दिलेल्या सुचनांचे पालन करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सहकार्य करण्याचे मनपा
प्रशासनाव्दारे आवाहन करण्यात आले आहे. |
Comments
Post a Comment