AMC Social Cell

महानगरपालिकेमध्‍ये सोशल सेलची स्‍थापना
अकोला दि. 27.03.2020 – कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी संपुर्ण देशमाध्‍ये  14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊनचे आदेश पारित केलेले आहे. विषाणुचा प्रसार रोखण्‍यासाठी गर्दी कमी करणे हा एकमात्र उपाय आहे. या आवाहनाला नागरीकांकडुन प्रतिसाद सुध्‍दा मिळत आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेकांच्‍या उपजिवीकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना मदतीच्‍या प्रस्‍तावासह पुढे सरसावल्‍या आहेत. या मदत दाते आणि अकोला शहरातील गरजू कुटुंबांमध्‍ये समन्‍वय असणे गरजेचे आहे याकरिता अकोला महानगरपालिका समन्‍वयकाची भुमिका पार पाडणार आहे. त्‍यासाठी महापालिकेत सोशल सेल गठीत करण्‍यात आला आहे. यासाठी शहरातील दानशुर व्‍यक्‍ती तसेच सामाजिक संघटनांच्‍या मदतीची गरज आहे. महापालिकेला आर्थीक स्‍वरूपात, मनुष्‍यबळ स्‍वरूपात, धान्‍य स्‍वरूपात अथवा किराणा स्‍वरूपात तर सामाजिक संघटनांकडून ही मदत गरजुंपर्यंत पोहचविण्‍यासाठी मदत आवश्‍यक ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन दानशुर व्‍यक्‍ती तसेच सामाजिक संघटनांनी ते देणार असलेल्‍या मदतीच्‍या स्‍वरूपाचा प्रस्‍ताव अपेक्षीत आहे. यासाठी योगेश मारवाडी 7709588222 व महेश राऊत 7709043388 राजेंद्र देशमुख 7709043155 पंकज देवळे 9850162539 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केलेले आहे. 

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.