कोरोनाच्या पार्श्ववभुमिवर मनपा प्रशसासन व पोलीस प्रशासनाव्दारे भाजी विक्री व खरेदीसाठी करण्यात आलेली व्यावस्था्.




कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून अकोला शहरामध्‍ये याचा प्रादुर्भाव होउ नये तसेच जनता भाजी बाजार येथे होणारी भाजी खरेदी करणा-यांची गर्दी लक्षात घेता मनपा आयुक्‍त यांच्‍या आदेशान्‍वये काल रात्री उशीरापर्यंत मनपा बाजार विभाग अतिक्रमण विभागातील कर्मचा-यांव्‍दारे टॉवर चौक व नवीन बस स्‍थानक समोरील मुख्‍य रस्‍त्‍यावर 1 मिटर अंतरावर मार्कींग करण्‍यात आली आहे. तसेच आज सकाळी पोलीस प्रशासनाच्‍या वतीने भाजी घेणा-यांना रांगेत ठेवून क्रमाने भाजी घेण्‍याकरिता बाजारात पाठविण्‍यात आले आहे. याप्रकारे केलेल्‍या उपाययोजनामुळे भाजी बाजारीत होणारी गर्दी आश्‍चर्यजनकरितीने कमी झाली आहे व भाजी घेणा-यांना आपल्‍या आरोग्‍याबद्दलची चिंता कमी झाली आहे. 

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.