आज सकाळी मनपा आयुक्त यांनी होलसेल किराणा व्यावसायिकांना सोशल डिसटसींग ठेवण्याबाबत केली चर्चा.



कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून अकोला शहरामध्‍ये याचा प्रादुर्भाव टाळण्‍याकरिता सोशल डिस्‍टगींग ठेवणे व गर्दीच्‍या ठिकाणी न जाणे मात्र हेच प्रभावी उपाय असून आज मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी नगरसेवक अमोल घोगे यांच्‍या सोबत हायवेवर असलेले होलसेल किरणा बाजार येथे सकाळी भेट देउन व्‍यावसायिकांशी चर्चा केली व त्‍यांना सामान घेणा-यांना किमान 1 मीटर अंतरावर ठेवण्‍यासाठी मार्कींग करून उभा करून रांगेने सर्वांना सामान देण्‍यात यावे व नागरिकांची गर्दी होउ नये यासाठी विशेष काळजी घेण्‍यासाठीच्‍या सुचना दिल्‍या. तसेच सर्वांनी मास्‍क किंवा चांगल्‍या प्रकारे धुतलेला रूमाल बांधण्‍यासाठी प्रवृत्‍त करावे अशा सुचना दिल्‍या.  

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.