कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आदिवासी समाजाचे कामगारांना दानदात्याकडून घेउन मनपा स्थाा.स.सभापती व नगरसेवकांनी केले जीवनावश्यक वस्तुंचे वितरण.
कोरोना
रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने पसरत असून शासाने संपुर्ण भारतात 21 दिवसांची
संचारबंदी लागू केलेली आहे. त्या अनुषंगाने मजुरीचे काम करणा-या कामगारांवर उपासमरीची
पाळी असून मनपा स्थायी समिती सभापती सतीष ढगे, नगरसेवक तुषार भिरड, शशी चोपडे व
मनपा कर्मचा-यांनी किराणा बाजार व भाजी बाजार येथे जाउन त्यांना विनंती केली असता
व्यावसायिकांनी स्वत:पुढाकार घेउन त्यांना किराणा व भाजीचा मुबलक साठा दिला
यावर पदाधिकारी व कर्मचा-यांनी त्या व्यावसायिकांचे मनापासून आभार व्यक्त करून
जीवनावश्यक सामग्री गरजू कामगारांना दिली. यावर दानदाता व्यावसायिकांचे सर्वीकडे
कौतुक होत आहे.
तसेच
यावेळी स्थायी समिती सभापती श्री सतीष ढगे यांनी शहरातील दानदातांना आवाहन केले
आहे कि, त्यांनी आपल्या उपाशी असणा-या कामगार व हातमजुरी करणा-यांसाठी असाच
सहकार्य करावे तसेच शहरातील गरजू नागरिकांना मदत हवी असेल किंवा मदत करावयाची असेल
तर अकोला महानगरपालिका येथे सोशल सेल उभारण्यात आला आहे कृपया अशा नागरिकांनी सोशल
सेलचे योगेश मारवाडी 7709588222 व महेश राऊत
7709043388 राजेंद्र देशमुख 7709043155 पंकज देवळे 9850162539 या क्रमांकांवर
संपर्क साधावा किंवा अकोला महानगरपालिकेतील हेल्पलाईन नंबर
18002335733/0724-2434412/0724-2423290/0724-2434414/0724-2430084 या
हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन
केले आहे.
Comments
Post a Comment