स्वयं स्फुर्तीने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा व भोजन. मनपा आयुक्त यांनी मानले मनापासून आभर.
स्वयंस्फुर्तीने विविध
संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा व भोजन. मनपा आयुक्त यांनी मानले
मनापासून आभार.
शहरातील गरजू नागरिकांना विविध संघटनांनी नाश्ता, चहा व भेजन
पुरविले आहे, ज्यामध्ये जिव्हाळा बहुउद्देशीय संस्था, जोगळेकर प्लॉट, डाबकी
रोड, अकोला (सौ.अलका राजाभाउ देशमुख), नांयगांव येथे 60 बेघरांसाठी पोळी, भाजी
वितरण, पी.टी.झेड.ग्रुप व्दारे बाळापुर नाक्या जवळ गरजू नागरिकांना 29 मार्च
पासून पोळी व भाजीचे वितरण, संत गाडगे बाबा सेवा समिती (अंकित शंके) यांच्या
तर्फे दि.21 मार्च पासून सकाळी व दुपारी बंदोबस्तात असलेले पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स,
सरकारी कार्यालय व गरजू नागरिकांना दररोज
100 लिटर चहाचे वितरण, श्री सेवा ट्रस्ट तर्फे दि. 25 मार्च पासून पोलीस कर्मचारी, सरकारी कर्मचारी व डॉक्टर यांना दररोज सकाळी
800 प्लेट नाश्ता, तसेच 1250 लोकांसाठी दुपारचे जेवण पुरविण्यात येते, शिवमुद्रा
प्रतिष्ठान गजानन नगर गल्ली नंबर 1 डाबकी रोड यांच्या मार्फत शहरातील डाबकी रोड
, जयहिंद चौक, वसंत चौक, माता नगर झोपडपट्टी, शिवससेना वसाहत व आंबेडकर नगर येथे
दि. 25 मार्च पासून रोज 250 नागरिकांकरिता खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.
या सर्व सेवाभावी संघटांनांच्या पदाधिकारी
व कार्यकर्तांचे मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी मनापासून आभार व्यक्त
केले आहे व ही सेवा संचारबंदी संपेपर्यंत अशीच अविरत चालू ठेवण्यासाठी विनंती
केली आहे. तसेच शहरातील जेही सेवाभावी संस्था अशा प्रकारच्या सेवा देण्यास ईच्छुक
असतील त्यांनी अकोला महानगरपालिका सोशल सेल येथे संपर्क साधण्याचे आवाहन मनपा
आयुक्त श्री कापडणीस यांनी केले आहे.
Comments
Post a Comment