कोरोनाच्या पार्श्वभुमिवर संपुर्ण शहरामध्येन अकोला महानगरपालिका व्दारा जंतुनाशक फव्वारणी.
कोरोना रोगाची साथ ही सर्वत्र वेगाने
पसरत असून या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अकोला महानगरपालिकांतर्गत असलेल्या
सर्व प्रभागांमध्ये 5 ट्रॅक्टर व्दारे तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर कोरोना
विषाणूचा संभाव्य प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरातील 9 मीटरपेक्षा जास्त असलेल्या
मुख्य रस्त्यांवर झोन निहाय 500 लीटर क्षमता असलेले 4, शक्तीमान प्रोटेक्टर
अत्याधुनिक मशीनव्दारे किटाणू व जंतुनाशक (सोडीयम हाईपोक्लोराईड ) फव्वारणीची
सुरूवात करण्यात आली आहे ही फव्वारणी यंत्र श्री प्राजल गोपनारायण, आदर्श फार्म
सर्विसेस (युनिमार्ट अकोला), यु.पी.एल.इंडीया लिमिटेड, मुंबई यांच्या सौजन्याने
निशुल्क करण्यात येत आहे मात्र ऑपरेटरचे मानधन व इंधनाचा खर्च महानगरपालिका
अकोला हे करणार आहे.
Comments
Post a Comment