कोरोनाच्या पार्श्वभुमिवर मनपा व्दारे बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण.
कोरोनाच्या
पार्श्वभुमिवर अकोला जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी अकोला महानगरपालिका
क्षेत्रांमध्ये प्रत्येक घरी जाउन सर्दी, खोकला किंवा कोरोना सदृष आजार
दिसणा-यांची तसेच बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या
नागरिकांची माहिती दिलेल्या प्रपत्रामध्ये
भरून घेण्यासाठी 300 पथकांव्दारे सर्व्हेक्षणाचे काम पुर्ण झाले असून पुर्व
क्षेत्रांतर्गत एकुण 32742 मालमत्तांना भेटी देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये
ईतर जिल्ह्यातून/गावांतून आलेल्या नागरिकांची संख्या 1778 आहे व विदेशातून
आलेल्या नागरिकांची संख्या 15 आहे, तसेच पश्चिम क्षेत्रांर्गत एकुण 36606 मालमत्तांना
भेटी देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये ईतर जिल्ह्यातून/गावांतून आलेल्या
नागरिकांची संख्या 1067 आहे व विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 89 आहे, तसेच
दक्षिण क्षेत्रांतर्गत एकुण 46023 मालमत्तांना भेटी देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये
ईतर जिल्ह्यातून/गावांतून आलेल्या नागरिकांची संख्या 1895 आहे व विदेशातून
आलेल्या नागरिकांची संख्या 12 आहे, तसेच उत्तर क्षेत्रांतर्ग एकुण 35142 मालमत्तांना
भेटी देण्यात आल्या आहेत ज्यामध्ये ईतर जिल्ह्यातून/गावांतून आलेल्या
नागरिकांची संख्या 400 आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाव्दारे शहरातील
नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, बाहेरून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून 14
दिवस होम क्वारंटईनमध्ये राहून सहकार्य करावे ही विनंती.
Comments
Post a Comment