कोरोनाच्या पार्श्वभुमिवर बाहेरील जिल्ह्यातून, राज्यातून व विदेशातून आलेल्या नागरिकांचे सर्व्हेक्षणाचे काम शेवटच्या टप्याात.


कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येक घरी जाउन सर्दी, खोकला किंवा कोरोना सदृष आजार दिसणा-यांची तसेच बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची माहिती दिलेल्‍या प्रपत्रामध्‍ये भरून घेण्‍यासाठी 300 पथकांव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे काम शेवटच्‍या अप्‍प्‍यात असून आजपर्यंत पुर्व क्षेत्रांतर्गत 29951 मालमत्‍तांचे, पश्चिम क्षेत्रांर्गत 36524 मालमत्‍तांचे, उत्‍तर क्षेत्रांतर्गत 31745 मालमत्‍तांचे व दक्षिण क्षेत्रांतर्गत 37698 मालमत्‍तांचे सर्व्‍हेक्षणाचे काम पुर्ण झाले आहे. यामध्‍ये उत्‍तर व पश्चिम झोनचा सर्व्‍हेक्षणचा काम पुर्णत्‍वास आला आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे शहरातील नागरिकांना आवाहन करण्‍यात येत आहे कि, आपल्‍या घरी मनपा व्‍दारे येणा-या पथकास बाहेरून आलेल्‍या व्‍यक्‍तीची संपुर्ण माहिती देउन तसेच बाहेरून आलेल्‍या नागरिकांनी स्‍वत:हून 14 दिवस होम क्‍वारंटईनमध्‍ये राहून सहकार्य करावे ही विनंती.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.