कोरोनाच्या पार्श्वभुमिवर शहरात सर्व्हेक्षणाचे काम युध्द पातळीवर सुरू



कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर अकोला जिल्‍ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होउ नये यासाठी अकोला महानगरपालिका क्षेत्रांमध्‍ये प्रत्‍येक घरी जाउन सर्दी, खोकला किंवा कोरोना सदृष आजार दिसणा-यांची तसेच बाहेरील जिल्‍ह्यातून, राज्‍यातून व विदेशातून आलेल्‍या नागरिकांची माहिती  दिलेल्‍या प्रपत्रामध्‍ये भरून घेण्‍यासाठी 300 पथकांव्‍दारे सर्व्‍हेक्षणाचे काम युध्‍द पातळीवर सुरू करण्‍यात आली आहे. आजपर्यंत पुर्व क्षेत्रांतर्गत 34421 मालमत्‍तांपैकी 20585 मालमत्‍तांचे, पश्चिम क्षेत्रांर्गत 27300 मालमत्‍तांचे, उत्‍तर क्षेत्रांतर्गत 30180 मालमत्‍तांचे व दक्षिण क्षेत्रांतर्गत 22102 मालमत्‍तांचे सर्व्‍हे पुर्ण झाले आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाव्‍दारे शहरातील नागरिकांना आवाहन करण्‍यात येत आहे कि, आपल्‍या घरी मनपा व्‍दारे येणा-या पथकास बाहेरून आलेल्‍या व्‍यक्‍तीची संपुर्ण माहिती देउन तसेच बाहेरून आलेल्‍या नागरिकांनी स्‍वत:हून 14 दिवस होम क्‍वारंटईनमध्‍ये राहून सहकार्य करावे.   

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.