0 मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी केली विविध भागातील व्यावसायिक प्रतिष्ठांनांची पाहणी. 0 सोशल डिस्टसींग नियमाचे उल्लंघन करणा-या व्यावसायिकांवर मनपा व्दारे दंडात्म‍क कारवाई. 0 आज पासून सातव चौक, जठार पेठ व डॉ.आंबेडकर ग्राउंड येथील भाजी बाजार बंद तसेच एकाच ठिकाणी बसून भाजी विक्रीस बंदी – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.


अकोला दि. 30 एप्रील 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – संपुर्ण देशामध्‍ये कोरोनाची साथ सुरू असून देशामध्‍ये कोरोना विषाणूची साखळी तोडण्‍यासाठी व त्‍यावर नियंत्रण आणण्‍यासाठी लॉकडाउन करण्‍यात आले आहे याच सोबत नागरिकांनी घरातच थांबणे खूप गरजेचे आहे, अतिआवश्‍यक असेल तरच जीवनावश्‍यक वस्‍तू खरेदी साठी बाहेर पडावे व वस्‍तू घेण्‍यासाठी जातांना व वस्‍तू घेतावेळी सोशल डिस्‍टसींग (आपसातील अंतर किमान 1 मिटर अंतर ठेवणे) नियामाचे काटेकोरपणे पालन करणे व तोंडावर मास्‍क किंवा चांगला धुतलेला रूमाल बांधणे बंधनकारक आहे. याचसोबत सर्व जीवनावश्‍यक वस्‍तू विक्री करणा-या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठान धारकांनी 0 दुकाना समोर गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घेणे. 0 दुकानात आलेल्‍या नागरिकास सेनीटायझरचा वापर करणे बाबत तसेच दुकानात मालकांनी सेनीटायझर व हात धुण्‍याची सुविधा करणे व वेळोवेळी दुकानाचे काउंटर साफ करणे आवश्‍यक राहील. 0 नागरिकांना एक मिटर अंतर ठेउन लाईनमध्‍ये उभे करणे, या सुचनांचे काटेकोरपणे पालन न केल्‍यास संबंधीत दुकाने बंद करण्‍यात येणार.
          आज मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी सकाळी जठारपेठ चौक, सातव चौक, जवाहर नगर चौक, जुने शहर येथील काळा मारोती मंदीर रोड, डाबकी रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात लावण्‍यात आलेला भाजी बाजार येथे भेट दिली असून या भागातील व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानांव्‍दारे सोशल डिस्‍टसींग नियमाचे अल्‍लंघन केल्‍याचे आढळून आल्‍यावर भाजी विक्रेते प्रकाश लाबर, विनोद भटकर, मारोती डाहे तसेच दिपाली इलेक्‍ट्रीकल, सुभाष मुदगल, बालाजी डेली निड्स व एवन बेकरी यांचेसह लॉकडाउनमध्‍ये बिना परवानगी वतनदार प्रिंटींग प्रेस, विशाल प्‍लास्‍टीक स्‍टोअर्स तसेच गौरक्षण रोडवरील बालाजी फ्रुट यांनी 12 वाजेच्‍या नंतर ही दुकान सुरू ठेवली होती म्‍हणून यांच्‍यावर एकुण रूपये 8000/- ची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.
तसेच भाजी बाजारात सोशल डिस्‍टसींग नियमाचे उल्‍लंघन पाहता डाबकी रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, सातव चौक व जठार पेठ येथे लावण्‍यात आलेले भाजी बाजार हे बंद करण्‍यात येत असून सर्व भाजी विक्रेत्‍यांनी आप-आपल्‍या भागात फिरून भाजी विक्री करण्‍याचे तसेच कोणत्‍याही भागामध्‍ये किरकोळ भाजी विक्रेते हे एका जागेवर बसून भाजी विक्री करणार नाही असे आदेश मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी दिले आहे. तरी शहरातील नागरिकांनी अशा ठिकाणी जाउन गर्दी करायची नाही व आपल्‍या भागात येणा-या भाजी विक्रेता तसेच आपल्‍या भागातील किरणा दुकानावरून भाजी व किराणा सामान खरेदी करून मनपा प्रशासनास सहकार्य करण्‍याचे आवाहन मनपा आयुक्‍त श्री कापडणीस यांनी केले आहे.
          या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी श्री राजेंद्र टापरे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा अधिकारी श्री मुलसिंह चव्‍हाण, विरष्‍ठ आरोग्‍य निरीक्षक अमर खोडे, तसेच आरोग्‍य निरीक्षक रूपेश मिश्रा, मनोज सारवान, शुभम पांडे, उल्‍केश मुंडे, अशिष इंगोले, कुणाल भातकुले आदिंची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.