पश्चिम झोन अंतर्गत दोन दुकानावर मनपा व्दारे 5 हजार रूपयांची दंडात्मक कारवाई.
अकोला दि.
26 एप्रील 20 –
आकेला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव पसरू नये यासाठी
प्रशासनाव्दारे संपुर्ण लॉकडाउन घोषीत करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील
नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होउ नये साठी जीवनावश्यक वस्तू जसे
किराणा, भाजीपाला, दुध विक्री व प्रशासनाने परवानगी दिलेली प्रतिष्ठाने यांना
दुपारी 12 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याबाबत परवानगी देण्यात आली आहे, परंतू
जुने शहर, सांईबाबा व्यायाम शाळे जवळील दोन दुकाने सायंकाळ पर्यंत सुरू होती त्या
अनुषंगाने मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये व मनपा उपायुक्त
श्री वैभव आवारे यांच्या मार्गदर्शनात मनपा
पश्चिम क्षेत्रीय कार्यालय व आरोग्य विभाग मार्फत त्यांच्यावर एकुण 5 हजार
रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मनपा प्रशासनाव्दारे शहरातील सर्व
जीवनावश्यक वस्तू विक्री करणा-या व्यावसायिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी
प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेत आपली प्रतिष्ठाने सुरू ठेवावीत व सोशल डिस्टसींग
नियमाचे काटेकोरपणे पालन करूनच सामानाची विक्री करावी तसेच तोंडावर बिना मास्क
किंवा रूमाल बांधलेल्या ग्राहकांना सामानाची विक्री करू नये. व शहरातील
सर्व नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा चांगला घुतलेला रूमाल बांधणे अत्यावयक आहे.
शहरात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी घरातच राहावे, अतिआवश्यक असल्यास बाजारात
जातांना व खरेदी करतांना सोशल डिस्टसींग नियमाचे पालन करून व मास्क घालूनच सामान
खरेदी करण्यासाठी जावावे ही विनंती.
या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी श्री
राजेंद्र टापरे, आरोग्य विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, वरिष्ठ आरोग्य
निरीक्षक अमर खोडे, आरोग्य निरीक्षक विकेश मुंडे, कुणाल भातकुले, विजय गवई, विनीत
पांडे, आशिष इंगोले आदिंचा समावेष होता.
Comments
Post a Comment