मनपा व्दारे प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये आरोग्य विषयक सर्व्हेक्षणाकरिता आलेल्या पथकांना सहकार्य करावे. तसेच प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये भाजी, दुध विक्री करणा-या व्यावसायिकांना व किराणा सामान आणण्यासाठी दुकानदारास पास घेणे आवश्यक. – श्री संजय कापडणीस.मनपा आयुक्त्
अकोला दि. 9 एप्रील 20 – अकोला
महानगरपालिक क्षेत्रातील बैद पुरा व आकोट फैल येथे कोरोना संक्रमीत 2 रूग्ण आढळून
आल्याने दोन्ही ठिकाण हे (कंटेन्मेंट झोन) प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत
करण्यात आले आहे व पोलीस प्रशासनाव्दारे हा संपुर्ण एरिया सील करण्यात आला आहे
तसेच फक्त 10 ठिकाणी एन्ट्री व एक्सीट पॉईंट (आत जाणे व बाहेर जाण्याकरिता)
तयार करण्यात आले आहे या शिवाय या भागात राहणा-या कुठल्याही नागरिकांना भाजी व
किराणा घेण्यासाठी या भागातून बाहेर जाता
येणार नाही कृपया याची सर्वांनी दक्षता घ्यावी व मनपा प्रशासनाव्दारे भाजी
विक्रेता किरणा व्यावसायिकांना पास देउन भाजी व किरणाची व्यवस्था या भागाच्या
आत करण्यात आली आहे, मेडीकल कारणाने मनपा प्रशासनातील आयकार्ड असलेल्या
कर्मचारीच फक्त सर्व्हेक्षणा फिरत आहे म्हणून मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस
यांनी तेथील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे कि, त्यांनी आलेल्या पथकांना खरी
माहिती देउन कोरोनाशी लढा देण्यासाठी सहकार्य करावे. तसेच एखद्या व्यक्तीला
आरोग्य विषयक काही सेवा हवी असतील तसेच तेथील किराणा व्यावसायिकांना होलसेल व्यापा-यांकडून
किराणाचे सामान आणण्यासाठी जायचे असेल तर या पथकांतील कर्मचा-यांना सांगून किंवा
मनपा कंट्रोल रूमचे (टोल फ्री व हेल्पलाईन नंबर 18002335733/0724-2434412/0724
- 2423290/0724 - 2434414/0724 – 2430084) या नंबरवर संपर्क साधावे यांच्या मदतीने संबंधीत
विभागाचे क्षेत्रीय अधिकारी यांच्या मार्फत त्यांना तात्पुरती पास देण्यात
येईल.
Comments
Post a Comment