शहरात कोरोनाच्या रोकथामाबाबतच्याव उपाययोजनांचा केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री संजयजी धोत्रे यांनी घेतला आढावा.
अकोला दि. 13 एप्रील 20 – कोरोनाच्या पाशर्वभुमिवर
अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मनपा व्दारा करण्यात
येणा-या उपाययोजना बाबत आज दि. 13 एप्रील रोजी केंद्रीय राज्य मंत्री मा.ना.श्री
संजयजी धोत्रे यांनी अकोला मनपाच्या स्थायी समिती सभागृहात सोशल डिस्टसींगचे
नियम पाळून आढावा सभा घेतली. या सभेमध्ये आमदार श्री रणधीरजी सावरकर, महापौर
सौ.अर्चना जयंत मसने, मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस, उपमहापौर श्री राजेंद्र
गिरी, स्थायी समिती सभापती श्री सतीष ढगे, माजी नगरसेवक श्री जयंत मसने यांची
प्रामुख्याने उपस्थिती होती.
यासभेमध्ये
सर्वप्रथम अकोला मनपा क्षेत्रातील बैदपुरा व आकोट फैल भागामध्ये कोरोना संक्रमीत
रूग्ण आढळल्याने सील केलेल्या भागामध्ये कोरोना संक्रमीत रूग्णांच्या
संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी बाबतची विचारणा करण्यात आली तसेच या
भागामध्ये कोरोनाचा संक्रमण वाढू नये या बाबत मनपा प्रशासनाव्दारे करण्यात
येणा-या उपाययोजनांबाबतचा संपुर्ण आढावा घेण्यात आला. कंटेन्मेंट झोनमध्ये राहणा-या
संशयीत नागरिकांची तपासणी करून रॅण्डम सॅम्पल घेण्याबाबत सुचना केल्या. तसेच
आज रोजी अकोला शहरामध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठीची लॅब अकोला जिल्हा सामान्य
रूग्णालय येथे कार्यान्वीत करण्यात आली असून केंद्रीय मंत्री मा.ना.श्री धोत्रे
यांनी अधिष्ठाता यांना दुरध्वनीव्दारे अकोला क्षेत्रातील नमुने तपासणीचे अहवाल
तातडीने उपलब्ध करून देण्याबाबत सुचना देण्यात आल्या जेणे करून कोरोना
संक्रमणाच्या रोकथामाबाबतच्या उपाययोजना तातडीने करता येतील. तसेच महापौर सौ.मसने
यांनी मनपा कर्मचा-यांच्या वेतनाबाबत विचारणा करण्यात आली व आजच तातडीने
कर्मचा-यांना वेतन अदा करण्याबाबत सुचना केल्या. तसेच प्रलंबीत असलेल्या वेतना
करिता शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सुचना दिल्या. तसेच आमदार श्री
सावरकर यांनी कचरा घंटा गाडीवरील वाहन चालक यांना दोन हजार रूपये सानुग्रह अनुदान
देणेबाबत विचार करावा असे सुचना दिल्या. तसेच सभापती श्री सतीष ढगे यांनी नियमीत
सुरू असलेला भाजी बाजार एक दिवसा आड ठेवण्यात यावा असे सुचित केले असता मा.आयुक्त
यांनी दोन दिसामध्ये शासनाच्या नवीन मार्गदर्शक सुचना येणार आहे त्यानुसार त्या
प्रमाणे नियोजन करण्यात येणार असल्याबाबत सांगितले. याचसोबत शहरामध्ये स्वच्छता,
पथदिप, पाणी पुरवठा या सेवा सुरळीत सुरू राहावी याबाबत विशेष काळजी घेण्यासंदर्भात
सुचना दिल्या. तसेच यावेळी अकोला महानगरपालिकाव्दारा कोरोना विषाणूची
रोकथामाबाबत करण्यात आलेल्या उपाययोजना समाधानकारक असल्याचे केंद्रीय मंत्री
मा.ना.श्री संजयजी धोत्रे यांनी सांगितले.
यावेळी मनपा उपायुक्त श्रीमती रंजना गगे, श्री वैभव
आवारे, मंख्य लेखा अधिकारी श्री मनजीत गोरेगांवकर, सहा.आयुक्त पुनम कळंबे,
क्षेत्रीय अधिकारी श्री अजय गुजर, श्री संदीप गावंडे, श्री विठ्ठल देवकते, श्री
राजेंद्र टापरे, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.फारूख शेख, अतिक्रमण विभाग प्रमुख तथा
नगरसचिव श्री अनिल बिडवे, सामान्य प्रशासन विभागाचे श्री दिलीप जाधव, मोटर वाहन
विभागाचे श्री शाम बगेरे, आरोग्य विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, जलप्रदाचे
श्री एच.जी.ताठे, विद्युत विभागाचे श्री अमोल डोईफोडे व आदिंची यावेळी उपस्थिती
होती.
Comments
Post a Comment