शहरामध्ये कोरोना रूग्णाची संख्येमध्ये एकाने वाढ. आयुक्त यांनी केली कंटेन्मेंंट भागाची पाहणी.
अकोला दि.
15 एप्रील 20 – कोरोनाच्या पार्श्वभुविर दि. 15
एप्रील रोजी प्राप्त अहवालानुसार अकोला महानगरपालिका क्षेत्रातील बैदपुरा येथे
कोरोना संक्रमीत आढळल्याने कोरोना कोअर झोन व बफर झोन म्हणून सील करण्यात आला
होता. 13 एप्रील रोजी कोअर झोन मधील ताजनापेठ पोलीस स्टेशन जवळील राहणारा एक रूग्ण
शासकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी संध्याकाळी भरती झाला होता ज्याला मधुमेह,
उच्च रक्त चाप व श्वास घेण्यामध्ये अडचण होत होती त्याचे कोरोना संशयीत रूग्ण
म्हणून घस्याचे स्त्राव तपसाणी करण्याकरिता लॅबमध्ये पाठविण्यात आले होते
परंतू सदर रूग्ण हे त्याच रात्री मृत पावला. तसेच आज सकाळी त्याची रिपोर्ट
कोरोना पॉझेटीव्ह आली असल्याने शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येमध्ये एकाने
वाढ झाली असून मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री
कदम व मनपा वैद्यकीय चमु व क्षेत्रीय अधिकारी यांच्या समवेत संपुर्ण भागाची पाहणी
केली. तसेच यावेळी नागरिकांना आपल्या जवळपास सर्दी, खोकला किंवा ताप असलेले रूग्ण
असतील त्यांची माहिती कंटेन्मेंट भागामध्ये सर्व्हे करण्याकरिता आलेल्या
चमुंना देउन कोरोनाचा फैलाव रोकण्यासाठी मदत करावी व जीवनावश्यक वस्तू
खरेदीसाठी जातांना तोंडावर मास्क किंवा रूमाल बांधुन सोशल डिस्टसींग नियमाचे
काटेकोरपणे पालन करावे अशी विनंती केली आहे. तसेच त्या भागातील नागरिकांसाठी
जीवनावश्यक वस्तूंची (किराणा, भाजीपाला व दुध) यांची व्यवस्था आतच करण्यात
आली असून कंटेन्मेंट झोन मधला कोणताही नागरिक त्या भागातून बाहेर जाणार नाही व
बाहेरील कोणतेही व्यक्ती कंटेन्मेंट झोन मधे जाणार नाही याबाबतच्या सुचना मनपा
आयुकत यांनी तेथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचा-यांना दिली.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी श्री अजय
गुजर, श्री विठ्ठल देवकते, श्री संदीप गावंडे, श्री राजेंद्र टापरे, डॉ.प्रभाकर
मुदगल, डॉ.अस्मिता पाठक, प्रवीण मिश्रा तसेच वैद्यकीय कर्मचा-यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment