जीवनावश्यक वस्तू, मेडीकल, कृषी व कृषी विषयक दुकाने वगळून मोबाईल सेलींग, हार्डवेअर, भांडी विक्री, फरसाण, स्वीटमार्ट, सलून, ऑप्टीकल्स यांना दुकाने उघडण्याची परवानगी नाही - मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.
अकोला दि.
22 एप्रील – अकोला
महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाव्दारे
संपुर्ण शहर हे लॉकडाउन करण्यात आले आहे तसेच शहरातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा
तुटवडा होउ नये यासाठी किरणा, भाजीपाला, दुध विक्री, मेडीकल दवाखाने कृषी व कृषी
विषयक सामग्रीची दुकाने व याचसोबत प्रशासनाने निर्धारित केलेली दुकाने ठरवून
दिलेल्या वेळेमध्ये सुरू ठेवण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने आज दि. 22 एप्रील
रोजी मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी मनपा क्षेत्रातील सातव चौक, जठारपेठ,
जवाहर नगर चौक सिव्हील लाईन चौक या भागांची पाहणी केली असता त्यांना भांडीची दुकाने,
हार्डवेअर, सलून, ऑप्टीकल्स, मोबाईल सेलींग आदि दुकाने उघडी दिसल्यावर त्यांनी
सदर व्यावसायिकांना भेट देउन त्यांची दुकाने बंद ठेवण्याबाबत सुचना दिली तसेच
यापुढे लॉकडाउनच्या काळामध्ये सदर दुकाने उघडी दिसल्यास त्यांच्यावर दंडात्मक
व सील सारख्या अप्रीय कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशारा दिला. तसेच यावेळी
मनपा आयुक्त यांनी कर्तव्यावर हजर असलेल्या पोलीस कर्मचारी यांना देखील या
प्रकारची दुकाने बंद ठेवण्यात याव्या याबाबत सुचना दिल्या.
तसेच यावेळी मनपा आयुक्त यांनी
जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी जाणा-या नागरिकांना आपसातील अंतर किमान 1 मिटर
ठेवणे याचे काटेकोरपणे पालन करणे व चेह-यावर मास्क किंवा रूमाल बांधण्याचे आवाहन
केले आहे.
Sir
ReplyDeleteplz tell me about mobile phone repairing center.is open or not.
Thanks...
This comment has been removed by the author.
Delete