सिंधी कॅम्प येथील पुंगली कारखान्यावर मनपा आरोग्य विभाग व बाजार विभागाव्दारे सीलची कारवाई.
अकोला
दि. 23 एप्रील ये यासाठी शहरात फक्त किराणा, भाजीपाला, दुध, मेडीकल,
दवाखाने तसेच प्रशासनाने परवानगी दिलेल्या काही प्रतिष्ठाने निर्धारित वेळेत
उघण्याची परवानगी देण्यात आली आहे, लॉकडानच्या काळामध्ये या व्यतिरिक्त कोणतेही
व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडण्यास प्रतिबंधीत करण्यात आले असून आज दि. 23
एप्रील रोजी अकोला मनपा दक्षिण क्षेत्रांतर्गत सिंधी कॅम्प स्थित, छत्रपती शिवाजी
महाराज पुतळ्या जवळील कमल चंदवानी यांनी
त्यांचा वसंत पुंगली कारखाना सुरू केला असता मनपा आरोग्य विभाग व बाजार विभागाव्दारे
पुंगली कारखान्यावर सिल लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. – कोरोना विषाणूचा
फैलाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात 3 मे पर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे, अकोला
महानगरात नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होउ न
शहरातील नागरिकांना मनपा प्रशासनाव्दारे
आवाहन करण्यात येत आहे कि, लॉकडाउनच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून कोरोनाची साखळी तोडण्याच्या
कामामध्ये सहकार्य करावे. घरातच राहावे, सुरक्षित राहावे.
ही कारवाई मनपा आयुक्त श्री संजय
कापडणीस यांच्या आदेशान्वये व मनपा उपायुक्त श्री वैभव आवारे यांच्या
मार्गदर्शनात करण्यात आली असून कारवाईत क्षेत्रीय अधिकारी श्री संदीप गावंडे, आरोग्य
विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, बाजार/परवाना विभाग प्रमुख श्री संजय खराटे,
गौरव श्रीवास, आरोग्य निरीक्षक प्रताप राउत, बाजार विभागाचे सुरेंद्र जाधव, सनी
शिरसाट, दिनेश ठाकरे, रविंद्र निवाणे आदिंची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment