सिंधी कॅम्प येथे राहणा-या एका व्यक्तिची कोरोना टेस्ट पाझेटीव्ह मनपा आयुक्त यांनी केली संपुर्ण भागाची पाहणी.
अकोला दि.
26 एप्रील 20 –
अकोला महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण क्षेत्रांतर्गत असलेल्या सिंधी कॅम्प,
मनपा सिंधी हिंदी शाळा क्रं. 1 च्या जवळ राहणारा एक रुग्णाची कोरोना चाचणी पॉझेटीव्ह
आल्याने आज सकाळी मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी उपविभागीय दंडाधिकारी डॉ.श्री
निलेश अपार व पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे, तहसीलदार श्री विजय लोखंडे तसेच
मनपा अधिकारी/कर्मचारी यांच्या समवेत सिंधी कॅम्प येथील पाहणी केली, यावेळी जिल्हा
प्रशासनाव्दारे कंटेन्मेंट झोन व बफर झोन निश्चीत करून सील करण्यात आला आहे.
यावेळी संपुर्ण भागाला सेनीटाईज करण्यासाठी
जंतुनाशक फव्वारणीचे कामाला सुरूवात करण्यात आली व कंटेन्मेंट भागामध्ये मनपा
वैद्यकीय चमुव्दारे सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याबाबत व रूग्णाच्या संपर्कात असलेल्या नागरिकांचा शोध घेउन त्यांची
चाचणी करून त्यांना क्वारंटाईन करण्याच्या सुचना मनपा आयुक्त यांनी यावेळी
दिली आहे. तसेच त्या रूग्णाची जी.एम.डी.मार्केट येथे मोठी किराणा दुकान व गोडाउन
असून ती सुध्दा सिल करण्यात आली आहे व मनपा आयुक्त यांनी या दुकानाच्या माध्यमातून
या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे सुध्दा शोध घेउन त्यांची तपासणी
करण्याच्या सुचना यावेळी दिल्या. तसेच रूग्णाच्या संपर्कात आलेल्या
नागरिकांनी व कंटेन्मेंट झोन मधल्या नागरिकांनी मनपा कडून सर्व्हेसाठी येणा-या
पथकांना सर्दी, खोकला, ताप, घसादुखी आदिंबाबतची माहिती देउन सहकार्य करण्याचे
आवाहन मनपा आयुक्त यांनी केले आहे. तसेच त्या रूग्णाचे नातेवाईक व संपर्कात
आलेल्या आज संध्याकाळ पर्यंत एकुण 35 नागरिकांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाईन
करण्यात आले आहे.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी श्री अजय
गुजर, श्री संदीप गावंडे, श्री विठ्ठल देवकते, श्री राजेंद्र टापरे, आरोग्य विभाग
प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, श्री संजय खराटे, श्री शाम बगेरे, प्रवीण मिश्रा,
आरोग्य निरीक्षक आदिंची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment