सिंधी कॅम्प कंटेन्मेंट झोन मध्ये राहणा-या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी मनपा आयुक्त यांनी दिली दक्षिण झोन अधिकारी कर्मचारी यांना सुचना.
अकोला
दि. 27 एप्रील 20 कोरोना पॉझेटीव्ह रूग्ण आढळल्याने जिल्हा
प्रशासनाव्दारे पाटील दुध डेअरी गजानन कमान, स्मशान भुमि चौक, गादी कारखाना चौक,
कैलास टेकडी रोड, सिंधी कॅम्प नाला, गणेश बुक स्टोअर्स, हरिष मेडीकल या
बॉंड्रीच्या आतमधला संपुर्ण परिसर सिल करण्यात आला असून या भागातील राहणा-या
नागरिकांना बाहेर जाता येणार नाही व बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत जाता येणार
नाही. तसेच कंटेन्मेट भागाच्या आत राहणा-या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू जसे
मेडीकल, भाजीपाला, किराणा व दुध याचा तुटवडा होउ नये यासाठी मनपा आयुक्त श्री
संजय कापडणीस यांनी दक्षिण झोन कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांना
याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी सुचना दिल्या. – अकोला
महानगरपालिका क्षेत्रातील दक्षिण झोन अंतर्गत असलेल्या सिंधी कॅम्प या परिसरात काल
त्या
अनुषंगाने या भागातील मेडीकल स्टोअर्स, किराणा व्यावसायिक, भाजी विक्रेते व
दुध विक्रेते जे कंटेन्मेंट झोन मध्ये जीवनावश्यक वस्तूच्या पुरववठा करणार
आहे त्यांचे नंबर कंटेन्मेंट झोन मध्ये राहणा-या प्रत्येक घरातील नागरिकांना
झोन कार्यालयामार्फत देण्यात आले आहेत त्यानुसार प्रत्यक्षात अंमल बजावणी
सुरू करण्यात आली आहे.
|
तसेच
याभागात राहणा-या नागरिकांचा दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यासाठी एकुण 20 चमुचे गठन
करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून दररोज सर्व्हेक्षणचे काम सुरू करण्यात
आले असल्याचे मनपा आयुक्त यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच कंटेन्मेंट झोन मधील
नागरिकांनी मनपा कडून सर्व्हेक्षणासाठी येणा-या पथकांना मदत करण्याचे तसेच
सर्दी, ताप, खोकला व घसादुखी आजाराने ग्रसीत असलेल्या नागरिकांबाबतची
माहिती देउन सहकार्य करण्याचे आवाहन मनपा आयुक्त यांनी यावेळी केले आहे. तसेच
याबाबत कोणतीही माहिती किंवा जीवनावश्यक वस्तू विषयक तक्रार असल्यास त्यांनी
मनपाच्या टोल फ्री क्रमांक व हेल्पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412,
0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर कळवावे असे आवाहन केले
आहे.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी श्री संदीप
गावंडे, कर अधिक्षक श्री विजय परतवार, कनिष्ठ अभियंता मनोज गोकटे, आरोग्य
निरीक्षक रूपेश मिश्रा, सुनिल खेते, प्रताप राउत, सोहम पांडे आदिंची उपस्थिती
होती.
Comments
Post a Comment