मनपा आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक व उपविभागीय दंडाधिकारी यांनी संयुक्तरित्या् केली कृषी नगर कंटेन्मेंट झोनची पाहणी.
अकोला
दि. 28 एप्रील 20 आहे. सदरचा
भाग हा कंटेन्मेट झोन म्हणून प्रशासनाव्दारे
सील करण्यात आला आहे. – अकोला
शहरामध्ये आज नव्याने 5 कोरोना पॉझेटीव्ह रूग्ण आढळले असून 3 रूग्ण हे सिंधी
कॅम्प मधील रूग्णाचे नातेवाईक असून 2 रूग्ण हे सिंधी कॅम्प येथील रूग्णाच्या
दुकानात काम करणारे असून ते कृषी नगर स्थित न्यु भिम नगर येथील रहिवाशी
आज मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस,
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री अमोघ गांवकर व उपविभागीय दंडाधिकारी डॉ.श्री निलेश अपार यांनी
कंटेन्मेट झोनची पाहणी केली असून या भागातील राहणा-या नागरिकांना बाहेर जाता
येणार नाही व बाहेरील कोणत्याही व्यक्तीला आत जाता येणार नाही. तसेच कंटेन्मेट
भागाच्या आत राहणा-या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू जसे मेडीकल, भाजीपाला,
किराणा व दुध याचा तुटवडा होउ नये यासाठी मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी पुर्व
झोन कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व कर्मचा-यांना याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी
सुचना दिल्या. तसेच या भागात निर्जंतुक करण्यासाठी फव्वारणी करण्याची तसेच याभागात
राहणा-या नागरिकांचा दैनंदिन सर्व्हेक्षण करण्यासाठी एकुण 15 चमुचे गठन करण्यात
आले असून त्यांच्या माध्यमातून दररोज सर्व्हेक्षणचे काम होणार असल्याचे मनपा
आयुक्त यांनी यावेळी सांगितले आहे. तसेच कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांनी मनपा
कडून सर्व्हेक्षणासाठी येणा-या पथकांना मदत करण्याचे तसेच सर्दी, ताप, खोकला व
घसादुखी आजाराने ग्रसीत असलेल्या नागरिकांबाबतची माहिती देउन सहकार्य करण्याचे
आवाहन मनपा आयुक्त यांनी यावेळी केले आहे. तसेच याबाबत कोणतीही माहिती किंवा
जीवनावश्यक वस्तू विषयक तक्रार असल्यास त्यांनी मनपाच्या टोल फ्री क्रमांक व
हेल्पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414,
0724-2430084 या नंबरांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी तथा कार्यकारी
अभियंता श्री अजय गुजर, सिव्हील लाईन पोलीस स्टेशनचे थानेदार श्री भानुप्रताप
मडावी, आरोग्य विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, उप अभियंता कृष्णा वाडेकर, वरिष्ठ
आरोग्य निरीक्षक शैलेश पवार, आरोग्य निरीक्षक निखील कपले, प्रशांत जाधव, प्रशिष
भातकुले, धनराज पचरवाल, सोहम कुलकर्णी व पोलीस कर्मचा-यांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment