मेडीकल स्टोअर्स चालकांनी ताप, सर्दी, खोकला, घसादुखी यासाठी औषधी घेण्याकरिता येणा-या रुग्णांची माहिती मनपा हेल्प लाईन नंबरवर किंवा क्षेत्रीय अधिकारी यांना द्यावी – मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस.


अकोला दि. 22 एप्रील  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी अकोला महानगरपालिका व्‍दारा कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू आहे. परंतू शहरामध्‍ये कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्‍यासाठी अकोला मनपा क्षेत्रातील सर्व नागरिकांनी त्‍यांना असलेला ताप, सर्दी, खोकला, घसादुखी संदर्भातील माहिती मनपा प्रशासनास देणे आवश्‍यक असून आज मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मेडीकल स्‍टोअर्स संचालकांना तसेच केमीस्‍ट अॅण्‍ड  ड्रगीस्‍ट असोसिएशन यांना आदेश निर्गमीत केले आहे ज्‍यामध्‍ये मेडीकल स्‍टोअर्स मध्‍ये औषधी खरेदी करण्‍यासाठी येणा-या ग्राहकांमध्‍ये ताप, सर्दी, खोकला, घसादुखी या रोगांवर औषधी मागणी करीत असलेल्‍या ग्राहकांची (रूग्‍णांची) माहिती (जसे रूग्‍णाचे संपुर्ण नांव, संपुर्ण पत्‍ता व मोबाईल नंबर) अकोला महानगरपालिकेच्‍या टोल फ्री क्रमांक व हेल्‍पलाईन नंबर 18002335733, 0724-2434412, 0724-2423290, 0724-2434414, 0724-2430084 या नंबरांवर किंवा संबंधीत झोन अधिकारी यांना माहिती कळवावी असे आदेशित केले आहे.

Comments

Popular posts from this blog

दि. 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या‍ घरावर तिरंगा ध्वज फडकवून या राष्ट्रीय कार्यक्रमात आपले मोलाचे सहकार्य करावे – कविता व्दिवेदी, मनपा आयुक्तय तथा प्रशासक

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.

मनपाव्दारा ध्वेज विक्री सुरू.