कोरोनाच्याग पार्श्ववभुमिवर घेतलेल्या बैठकीमध्येम कोरोनामुळे मृत्यु झालेल्याी कर्मचा-यांना 15 लक्ष रूपये सानुग्रह अनुदान – महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांचा महत्वपुर्ण निर्णय.
अकोला दि. 9 एप्रील 20 – कोरोनाच्या पार्श्वभुविर अकोला महानगरपालिका
क्षेत्रातील बैदपुरा व आकोट फैल या भागात कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्याने अकोला
शहरात कोरोना विषाणूचा फैलाव होउ नये यासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी
आज दि. 9 एप्रील रोजी आमदार श्री रणधीरजी सावरकर यांच्या मार्गदर्शनात महापौर
सौ.अर्चना जयंत मसने यांनी, उपमहापौर श्री राजेंद्र गिरी, मनपा आयुक्त श्री संजय
कापडणीस, माजी महापौर श्री विजय अग्रवाल यांच्या उपस्थितीत मनपा स्थायी समिती
सभागृहात सोश डिस्टसींगचे नियम पाळून बैठक घेतली.
या बैठकीमध्ये सर्वप्रथम
बैदपुरा व आकोट फैल येथील प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये कोरोना विषणूचा फैलाव होउ नये
याबाबत मनपा प्रशासनाव्दारे करण्यात येणा-या उपाययोजनांबाबत, वैद्यकीय आरोग्य
चाचणी बाबत तसेच त्या भागात राहणा-या नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्याबाबत
माहिती घेण्यात आली तसेच प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये सेनीटाईज करण्यासाठी फव्वारणी
तसेच वैद्यकीय पथकांव्दारे तपासणी करण्या संदर्भात निर्देश दिले. तसेच आज रोजी 6 वैद्यकीय
पथके जिल्हा सर्वोपचार रूग्णालय तर्फे उपलब्ध असून या व्यतिरिक्त 4 पथके देणे
संदर्भात आमदार श्री सावारकर यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याशी फोनव्दारे
संपर्क साधून त्वरीत उपलब्ध करून देण्याबाबत सुचित केले. तसेच मनपा अधिकारी/कर्मचारी
यांना कोरोना विषाणूमुळे संसर्ग झाल्यास व सदर संसर्गाच्या माध्यमातून सदर
कर्मचा-याचा मृत्यु झाल्यास सानुग्रह अनुदान म्हणून 15 लक्ष रूपये त्यांच्या
परिवारास देणे बाबत महापौर सौ.मसने व आमदार श्री सावरकर व उपस्थित पदाधिकारी यांनी
चर्चा केली चर्चे अंती प्रशासनाव्दारा अकोला महानगरपालिका अंतर्गत कोरोनाच्या
पार्श्वभुमिवर अत्यावश्यक सेवेमध्ये सर्व कर्मचारी व अधिकारी हे खूप चांगल्या
प्रकारे सेवा देत आहे त्या बद्दल मनपा आयुक्त यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या कामामध्ये मनपा प्रशासनाव्दारा या रोगापासून
बचावासाठीच्या शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व उपाययोजना प्रशासनाने
केलेली आहे (जसे मास्क सेनीटायझर, हॅण्ड ग्लोज वैद्यकीय तपासणी ईत्यादी)
यामुळे कोरोनाची लागण कर्मचा-यांना होत नाही परंतू तरी सुध्दा अधिकारी/कर्मचारी
हे अत्यावश्यक सेवा देण्याच्या कामामध्ये आपला जीव धोक्यात टाकून दि. 15
मार्च 2020 पासून सेवा बजावत आहेत आणि या कालावधीत ज्यांची उपस्थिती 80 टक्के होती
अशा कर्मचा-यांपैकी आपली सेवा देतांना कोरोनाशी लागण झाल्यामुळे मृत पावल्यास रूपये
15 लक्ष सानुगृह अनुदान म्हणून देण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी क्षेत्रीय अधिकारी
श्री अजय गुजर, श्री संदीप गावंडे, श्री विठ्ठल देवकते, अतिक्रमण विभाग प्रमुख
श्री अनिल बिडवे, श्री राजेंद्र टापरे, डॉ.अस्मिता पाठक, जलप्रदायचे श्री
एच.जी.ताठे, सामान्य प्रशासन विभागाचे श्री दिलीप जाधव, बाजार विभागाचे श्री संजय
खराटे, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे आदिंची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment