मनपा सोशल सेलच्या समन्वयाने विविध संघटनांनी गरजुंना पुरविले नाश्ता, चहा, खिचडी व भोजन.


अकोला 6 एप्रील 20 – कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर संचार बंदीच्‍या काळामध्‍ये अकोला महानगरपालिकेच्‍या सोशल सेलच्‍या समन्‍वयाने दि. 5 व 6 एप्रील रोजी सामाजिक संघटना, स्‍वयंसेवी संघटना व दानशूर व्‍यक्तिंव्‍दारे शहरातील एकुण 3745 गरजू नागरिकांना नाश्‍ता, चहा भोजन पुरविण्‍यात आले आहे. ज्‍यामध्‍ये आशिष सारडा, समर्थ सेवा मंडळ, संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था, शिवमुद्रा प्रतिष्ठान, जिव्‍हाळा बहुउद्देशीय संस्‍था, श्रीनिवास केटरींग, शिवर मित्र मंडळ, वैभव देशमुख व ग्रुप, श्रीराम उत्‍सव समिती, शिवराय ग्रुप, रुहाटिया ट्रस्ट, आर्शीया खान, प्रकांत दलाल, संग्राम गावंडे ग्रुप आदिंचा समावेष आहे. याचसोबत दानशुर व्‍यक्‍तींकडून मिळालेल्‍या  अन्‍नदानचे शहरातील विविध भागातील एकुण 13 दिव्‍यांगांच्‍या परिवारला अन्‍न/धान्‍य व किराणा सामान देण्‍यात आले.
अकोला शहरामध्‍ये संचार बंदीच्‍या काळात गरजू नागरिकांपर्यंत जीवनावश्‍यक वस्‍तू पुरविणारी  सर्व सेवाभावी संघटांनांच्‍या पदाधिकारी कार्यकर्तांचे तसेच दानशूर नागरिकांचे मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी मनापासून आभार व्‍यक्‍त केले आहे ही सेवा संचारबंदी संपेपर्यंत अशीच अविरत चालू ठेवण्‍यासाठी विनंती केली आहे. तसेच शहरातील जेही सेवाभावी संस्‍था अशा प्रकारच्‍या सेवादेत आहेत किंवा देण्‍यास ईच्‍छुक असतील त्‍यांनी परस्‍पर भोजन देता अकोला महानगरपालिका सोशल सेलशी  संपर्क साधावे जेणे करून शहरातील सर्व गरजू नागरिकांना ही सेवा चांगल्‍या प्रकारे देता येईल असे आवाहन मनपा आयुक्‍त श्री कापडणीस यांनी केले आहे.
अकोला महानगरपालिका सोशल सेल येथील कर्मचा-यांचे नांव मोबाईल नंबर खालील प्रमाणे आहे.
 1) योगेश मारवाडी – 7709588222, 2) महेश राऊत – 7709043388, 3) राजेंद्र देशमुख- 7709043155, 4) पंकज देवळे - 9850162539 कृपया दानशूर नागरिकांनी समाजसेवी संघटानांनी या क्रमांकांवर संपर्क साधून शहरातील प्रत्‍येक गरजू नागरिक पर्यंत भोजनाची सेवा उपलब्‍ध होईल यासाठी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे.


Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.