मास्क न घालणा-या व सोशल डिसटसींग नियमाचे पालन न करणा-या व्यावसायिकांवर मनपाव्दारे दंडात्मक कारवाई.
अकोला दि. 13 एप्रील 20 – अकोला महानगरपालिका
क्षेत्रामध्ये कोरोना संक्रमीत रूग्ण आढळून आल्याने कोरोना विषणूचा फैलाव
शहरामध्ये होउ नये यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार शहरात जीवनावश्यक
वस्तु घेण्यासाठी जाणा-या प्रत्येक नागरिकनी तसेच व्यावसायिकांनी सोशल डिस्टसींग
नियमाचे पालन करणे व तोंडावर मास्क किंवा चांगला धुतलेला रूमाल लावणे बंधनकारक
आहे त्या अनुषंगाने आज दि. 13 एप्रील
रोजी पश्चिम क्षेत्रांतर्गत असलेल्या प्रभाग क्रं. 17 मध्ये व्यावसायिंकाना सोशल
डिस्टसींग नियमाचे उलंघन करण्याकरिता 1 किरणा दुकानधारकावर तसेच तोंडावर मास्क
न लावलेल्या 4 व्यावसायिकांवर 1100/- रूपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली
आहे. सदर कारवाई मनपा आयुक्त श्री संजय
कापडणीस यांच्या आदेशान्वये व मनपा उपायुक्त श्री वैभव आवारे यांच्या
मार्गदर्शनत करण्यात आली असून या कारवाईत आरोग्य निरीक्षक रवि माहोत, भावेश
संधलकर यांचा समावेष होता.
यावेळी मनपा
क्षेत्रातील सर्व नागरिकांना, शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शासनाने दिलेल्या
मार्गदर्शक सुचना जसे घरातच राहणे, सोशल डिस्टसींग, चेह-यावर मास्क किंवा रूमाल
बांधणे, बाजारात खरेदीसाठी जातांना व खरेदी करतांना आपसातील दुरी किमान एक मिटर
ठेवणे, वारंवार हात धुणे, तोंडावर हात न लावणे, हाताला सेनीटाईझ करण्यासाठी
सेनीटायझरचे वापर करणे आदिंचा पालन करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाव्दारे करण्यात
आले आहे.
Comments
Post a Comment