0 मनपा आयुक्त श्री संजय कापडणीस यांनी केली विविध भागातील व्यावसायिक प्रतिष्ठांनांची पाहणी. 0 सोशल डिसटसींग नियमाचे उल्लंघन करणा-या व्यावसायिकांवर मनपा व्दारे दंडात्मक कारवाई.


अकोला दि. 1 मे 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ   आज दि. 1 मे रोजी सकाळी मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी सकाळी जठारपेठ चौक, सातव चौक, जवाहर नगर चौक, टिळक रोड, आकोट मोटर स्‍टॅण्‍ड याचसोबत विविध भागांची पाहणी केली तसेच या भागातील जीवनावश्‍यक वस्‍तू जसे मेडीकल व किरणा स्‍टोअर्सच्‍या दुकानावर भेट देउन त्‍यांना सोशल डिस्‍टसींग नियमाचे पालन करण्‍यासाठी सक्‍तीचे निर्देश दिले तसेच एकाच जागी बसून भाजी विक्री करणा-या भाजी विक्रेत्‍यांना फिरून भाजी विक्री करण्‍याच्‍या सुचना दिली तसेच सोशल डिस्‍टसींग नियमाचे पालन न करणा-या व्‍यावसायिक प्रतिष्‍ठानावर दंडात्‍मक कारवाई करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या तसेच या पुढे जर त्‍यांनी कोरोनाची साखळी तोडण्‍यासाठीच्‍या कोणत्‍याही नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास त्‍यांच्‍या दुकानावर सील लावण्‍याची कारवाई करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. त्‍या अनुषंगाने मनपा अतिक्रमण विभागाव्‍दारे टिळक रोडवरील गोपी ट्रेडर्स, शाम ट्रेडर्स, संतोषी किराणा, मनीष आईल डेपो, आर.एन.एन्‍टरप्राईजेस, गौरव किराणा शॉप तसेच सुरेश कुमार लुल्‍ला यांच्‍यावर प्रत्‍येकी एक हजार रूपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली तसेच दक्षिण झोन कार्यालयाव्‍दारे गौरक्षण रोड, पारसकर शोरूम जवळ व तुकाराम चौक येथील एकाच जागी भाजी विक्री करणा-या 13 किरकोळ भाजी विक्रेत्‍यांवर प्रत्‍येकी दोनशे रूपयांची दंडात्‍मक कारवाई करून त्‍यांना उठविण्‍यात आले. तसेच शहरातील सर्व किरकोळ भाजी विक्रेत्‍यांनी रस्‍त्‍यावर किंवा मैदानात एकाच जागी बसून भाजी विक्री करू नये अन्‍यथा त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येणार आहे तसेच फळे व भाजी विक्री करणा-या दुकान व गाळे धारकांनी दुकानाच्‍या आत मध्‍ये सामान ठेवून व सोशल डिस्‍टसींग नियमाचे काटेकोरपणे पालन करूनच सामानाची विक्री करावी अन्‍यथा त्‍यांच्‍यावर दंडात्‍मक कारवाई करून त्‍यांची दुकाने बंद करण्‍यात येणार असल्‍याचे मनपा आयुक्‍त श्री संजय कापडणीस यांनी यावेळी सांगितले आहे.  
          या कारवाईत क्षेत्रीय अधिकारी श्री संदीप गावंडे, आरोग्‍य विभाग प्रमुख श्री प्रशांत राजुरकर, बाजार विभागाचे संजय खराटे, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा अधिकारी श्री मुलसिंह चव्‍हाण, गौरव श्रीवास, आरोग्‍य निरीक्षक शैलेश पवार, रूपेश मिश्रा, शुभम पांडे तसेच अतिक्रमण व बाजार विभागातील कर्मचा-यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.