मनपा किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे आज पर्यंत एकुण 298 नागरिकांचे घस्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले - मनपा आयुक्त संजय कापडणीस.
अकोला
दि. 8 मे 20 – अकोला
शहरामध्ये कोरोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता व कंटेन्मेंट झोनमधले संशयीत
नागरिकांची चाचणी सहजरित्या व जलदगतीने व्हावी यासाठी अकोला शहरातील कोरोना
संशयीत रुग्णांचे घस्यातील स्त्रावाचे नमुने जास्त प्रमाणात घेउन त्यांची
जांच करणे खूप गरजेचे असून मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या आदेशान्वये टिळक
रोडवरील मनपा किसनीबाई भरतीया रूग्णालय येथे घसातील स्त्रावाचे नमुने घेण्यासाठी
स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून व या कामास दि. 5 मे पासून सुरूवात करण्यात
आली आहे तसेच सदर नमुने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या तज्ञ डॉक्टरांव्दारे
घेण्यात येत असून नमुने तपासणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठविण्यात
येत आहे. यामध्ये दि. 5 मे रोजी दिवसभरात 120, दि. 6 मे रोजी 74 व आज दि. 7 मे
रोजी 50 तसेच दि.8 मे रोजी 54 नागरिकांचे असे एकुण आज पर्यंत 298 संशयीत
नागरिकांचे घस्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यात आले आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यायातील डॉ.फराह जिकारे, डॉ.गणेश पारणे,
डॉ.पुजा कोहर, डॉ.विद्या डोले यांच्याव्दारे घस्यातील स्त्रावाचे नमुने घेण्यात
आले. तसेच त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाचे डॉ.भास्कर सगणे,
डॉ.अशोक पातोर्डे, डॉ.सुरेश ढोरे, डॉ.प्रियेश शर्मा, डॉ.रचना सावळे, डॉ.प्रज्ञा
खंडेराव, डॉ.नंदकिशोर हागे, डॉ.तौसिफ इकबाल अनीस अहमद तसेच मनपा वैद्यकीय
विभागाचे डॉ.फारूख शेख, डॉ.प्रभाकर मुदगल, डॉ.अस्मिता पाठक यांच्या
मार्गदर्शनाखाली डॉ. विजय चव्हाण, डॉ.कादरी, डॉ.विपिन जाधव, डॉ.वासिक अली,
डॉ.मुसलोद्दीन यांचा समावेष आहे.
|
यावेळी मनपा आयुक्त
संजय कापडणीस, उपायुक्त श्रीमति रंजना गगे, वैभव आवारे, सहा.आयुक्त पुनम कळंबे,
क्षेत्रीय अधिकारी संदीप गावंडे, अनिल बिडवे, विठ्ठल देवकते, विजय पारतवार, दिलीप
जाधव, राजेंद्र टापरे, कार्यकारी अभियंता अजय गुजर, डॉ.कृष्णकांत शर्मा, आरोग्य
विभाग प्रमुख प्रशांत राजुरकर आदिंची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment