अमृत योजने अंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठाचे कामे त्वरीत पुर्ण करावे – महापौर अर्चना जयंत मसने.


अकोला दि. 1 मे 20  ी संख्‍येमध्‍ये एकाने वाढ – आज दि. 1 मे रोजी अकोला महानगरपालिका स्‍थायी समिती सभागृह येथे महापौर सौ.अर्चना जयंत मसने यांनी उपमहापौर श्री राजेंद्र गिरी, स्‍थायी समिती सभापती श्री सतीष ढगे, सभागृह नेत्‍या सौ.गीतांजलीताई शेगोकार, माजी महापौर श्री विजय अग्रवाल तसेच गटनेता श्री राहुल देशमुख यांच्‍या  प्रमुख उपस्थितीत अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये जलप्रदाय विभागाचे अमृत योजना अंतर्गत सुरू असलेले पाणी पुरवठ्याचे कामाबाबत सोशल डिस्‍टसींग नियमाचे पालन करून आढावा बैठक घेतली.
          या सभेमध्‍ये शासनाच्‍या मार्गदर्शक सुचनानुसार अमृत योजने अंतर्गत सुरू असलेल्‍या कामांवर काम करणा-या कर्मचा-यांना/मजुरांना पासेस देण्‍यात यावी तसेच जुने शहरातील प्रलंबीत असलेली व अपुर्ण राहलेली नवीन व जुनी पाईपलाईन बदलण्‍याची कारवाई तातडीने करण्‍याच्‍या सुचना देण्‍यात आल्‍या तसेच पाईपलाईन जोडणीची कामे व नागरिकांना अमृत योजने अंतर्गत कनेक्‍शन करून देणे तसेच सदर कनेक्‍शन जमीनीच्‍या वर न टाकता जमीनीच्‍या आत टाकणे आणि या योजने अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरील प्रलंबीत असलेले जलकुंभाचे काम सुरू करणे तसेच उर्वरित 25 कि.मी.राहलेली नवीन जलवाहिनीचे काम तातडीने सर्व्‍हे  करून पुर्ण करण्‍याचे काम त्‍वरीत करण्‍यात यावी व सदरची कामे दोन महिन्‍याच्‍या आत पुर्ण करण्‍याचे निर्देश यावेळी देण्‍यात आले.
          यावेळी मनपा शहर अभियंता श्री सुरेश हुंगे, मनपा कार्यकारी अभियंता श्री अजय गुजर, मजीप्राचे कार्यकारी अभियंता श्री सोळंके श्री राठोड, देशमुख, मनपा उपअभियंता श्री एच.जी.ताठे, मनपा अभियंता श्री नरेश बावणे, श्री शैलेश चोपडे व अमृत योजना पाणी पुरवठाचे कंत्राटदार श्री पंजवानी आदिंची उपस्थिती होती.


Comments

Popular posts from this blog

शहरातील व्यासायिकांनी सम आणि विषम दिनांकाप्रमाणे दुकाने उघडावी – संजय कापडणीस मनपा आयुक्त.

कोव्हीड-19 रूग्णांसाठी बेड उपलब्धतेची माहितीसाठी मनपातील कोव्हीड मदत कक्षात संपर्क साधावे.